• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Akanksha Puri Controversy : पैठणी आणि बिकीनी ब्लाऊज ? तो अवतार पाहून नेटकऱ्यांनी आकांक्षा पुरीला झाप झाप झापलं !

April 8, 2026 by admin Leave a Comment


पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा.. हे म्हटलं की डोळ्यांसमोर येते सुंदर पैठणी साडी. पैठणी साडीची महाराष्ट्रातील क्रेझ काही वेगळीच आहे. आपल्याकडे किमान एक तरी पैठणी असावी अशी प्रत्येक तरूणीची, महिलेची इच्छा असते. काहींकडे तर त्याचं अख्खं कलेक्शनही पहायला मिळतं. पैठणी, साजेसा ब्लाऊज, बांगड्या, गळ्यातलं, सुंदर कानातले आणि नथ.. असा पेहराव केल्यावर पैठणीचं सौंदर्य आणखीनच खुलतं. पण हीच पैठणी नेसल्यावर तिच्यासोबत कोणी बिकीनी ब्लाऊज घातला तर ? विचार करूनच नकोसं वाटतं ना… पण सुंदर पैठणी आणि त्यासोबत बिकीनी ब्लाऊज घालून फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करणारी आकांक्षा पुरी सध्या याच कारणामुळे चर्चेत असून त्यावरून बराच वादही झालाय.

खरंतर काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’मध्ये डिझायनर रोहित वर्माच्या शोला आकांक्षाने पाहुणी म्हणून हजेरी लावली. बिपाशा बसू शोस्टॉपर होती, पण सर्वांच्या नजरा आकांक्षावर खिळल्या होत्या. या कार्यक्रमासाठी तिने पारंपरिक महाराष्ट्रीयन पैठणी साडी निवडली , पण त्यासोबत तिने बिकिनी ब्लाउज घातला होता.

आकांक्षाचा लूक पाहून संतापले लोक

उत्तम फिटनेस आणि सुडौल शरीरामुळे आकांक्षा त्या लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मात्र, तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, अनेकांनी तिच्या ‘साडी नेसण्याच्या’ स्टाईलवरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली. पैठणीसारखी सुंदर साडी आणि त्यासोबत बिकीनी ब्लाऊज, म्हणजे संस्कृतीचा अपमान आहे, असं अनेकांनी म्हटलं. तर काहींनी तिच्या फॅशन सेन्सवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पैठणी साडीची सगळी वाट लावली, अशी कमेंटही काहींनी केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

स्तुती होत असेल तर ट्रोलिंगही ऐकावं लागेलच

बॉलिवूड, टीव्ही आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक सिद्ध केलेली आकांक्षा सध्या अश्मित पटेलसोबतच्या तिच्या ‘साडी फरमाईश’ या नवीन म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गाण्याच्या प्रमोशनदरम्यानच आकांक्षाने टीव्ही9 हिंदी डिजिटलला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, तिने या कपड्यांवरून निर्माण झालेल्या वादावर मनमोकळेपणाने भाष्य केलं.

हा संपूर्ण वाद आणि ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना आकांक्षाने अतिशय संयमीपणे उत्तर दिलं.  ती म्हणाली, “माझं या लूकबद्दल खूप कौतुक झालं आहे. पण मला असं वाटतं की जिथे कौतुक होतं, तिथे तोडंफार ट्रोलिंग होणारच. मी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणं पसंत करते, माझं लक्ष सकारात्मकतेवर असतं” असं म्हणत तिने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं.

एवढंच नव्हे तर तिने पुढे असंही स्पष्टीकरण दिलं की, हा लूक तिची निवड नव्हे, खरंतर ती डिझायनरची संकल्पना होती. ही साडी आणि ब्लाउज प्रसिद्ध डिझायनर रोहित वर्मा यांनी माझ्यासाठी खास डिझाइन केलं होतं असं तिने सांगितलं. “ही रोहित वर्मा यांची निर्मिती होती. मला त्याच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी मला ती साडी आणि ब्लाउज नेसायला दिली, त्याअर्थी त्यांनी ते नक्कीच विचारपूर्वक डिझाइन केले असणार. एक कलाकार म्हणून, मी त्यांच्या संकल्पनेचा आदर केला आणि आत्मविश्वासाने तो लूक साकारला.” असं स्पष्टीकरण देत तिने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in