
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला. या धक्कादायक बातमीने अख्का महाराष्ट्र अक्षरश: हादरला आहे. बारामतीत असलेल्या चार सभांसाठी अजित पवार हे त्यांच्या सेक्युरिटी गार्ड आणि इतर सहकाऱ्यांसाह आज सकाळीच मुंबईहून त्यांच्या प्रायव्हेट विमानाने निघाले. बारामतीजवळ विमान पोहोचत असताना लँडिंगवेळीच हा भीषण अपघात झाला. लँडिंग करताना हे विमान शेता कोसळलं आणि मोठा स्फोट झाला, क्षणात ते आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. अजित पवार यांच्यासह विमानतील 6 जणांचा मृत्यू झाला.
हे विमान क्रॅश झाल्यानंतरची काही दृश्य समोर आली असून त्यातून अपघाताची भीषणता दिसून येते. त्या विमानाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले आणि इतस्तत: विखुरले. आगीच्या ज्वाळांनी वेढल्या गेलेल्या या विमानाजवळ नंतर सर्वत्र फक्त धुराचे लोट दिसून येत होते. अपघातस्थळावरून भयानक दृश्ये समोर आली आहेत, ज्यामध्ये सर्वत्र धूर दिसत आहे.
व्हिडीओतून दिसली हृदय पिळवटून टाकणारी दृश्य
अपघातात हे विमान पूर्णपणे जळून खाक झालं. मिळालेल्या माहितीनुसार, हे अजित पवार यांचं खाजगी विमान होते. प्रशासन आणि सुरक्षा संस्था घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसंच विमान अपघाताच्या कारणाचा तपासही सुरू करण्यात आला आहे. समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये विमानाला आग लागल्याचे आणि त्याचे अनेक तुकडे झाल्याचे दिसून येते.
अपघातग्रस्त विमान हे लिअरजेट 45 प्रकारचे विमान होते, जे VSR द्वारे चालवले जात होते. अधिकृत माहितीनुसार, बारामती विमानतळावर कोसळलेल्या विमानात एकूण पाच जण होते. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्यासह इतर दोन लोक (एक पीएसओ आणि एक अटेंडंट) आणि दोन क्रू मेंबर्स (पीआयसी+एफओ) यांचा समावेश होता.
सभांसाठी बारामतीत येत होते अजित पवार
अजित पवार हे आज बारामती तहसीलमधील वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघात चार सभा घेणार होते, त्यासाठी ते खाजगी विमानाने येथे येत होते. पण नशीबात काही वेगळंच होतं. आणि हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील आणि राजकीय कारकिर्दीचा शेवटचा प्रवास ठरला.
Leave a Reply