• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या मृत्यूवर भुजबळांनाही शंका, म्हणाले विमान अचानक…

February 2, 2026 by admin Leave a Comment


अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता, अजित पवार हे मुंबईवरून बारामतीसाठी रवाना झाले होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच अचानक विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीवर धडकलं, घटनास्थळी मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली, या घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान दृष्यमानता कमी असल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे, ज्यामध्ये विमान हवेत घिरट्या घालताना दिसत आहे, आणि त्यानंतर ते अचानक पलटी होतं, त्यानंतर पुढील काही क्षणात अपघात झाल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातावर काही जणांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील विमान अपघातावर शंका उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे, त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी देखील या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आता छगन भुजबळ यांच्याकडून देखील अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे. विमान घिरट्या घालताना अचानक पलटी झाल्याचं दिसतंय,  कुठेतरी काहीतरी गडब झालीये, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. विमान दुसरी घिरटी घालत असातना विमान अचानक पलटी मारल्याचं दिसत आहे, आणि त्यानंतर काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं, चौकशी होईल, मी त्यातला काही तज्ज्ञ नाही. पण कुठेतरी काही तरी गडबड झली आहे. इंजिनमध्ये किंवा रडावमध्ये गडबड झाल्याचं वाटत आहे. आणखी काही असू शकतं, ठीक आहे, चौकशी होईल, त्याची माहिती सुद्धा समोर येईल, पण सोन्या सारखी माणसं गेली ती परत येणार नाहीत, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर
  • मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी सावधान, मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
  • 747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in