
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख , राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आत महीना होत आला आहे. गेल्या महिन्यात, 28 जानेवारी रोजी त्यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि त्यामध्ये अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. बारामतीसह अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. पवार कुटुंबियांचा शोकाकूल चेहरा पाहून तर सर्वांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातापातने घडवला अशी शंका गेल्या काही दिवसांपासून उपस्थि होत आहे. अजित पवार यांचे पुतमे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गगटाचे आमदार रोहित पवार यांनी तर हा मुद्दा चांगलाच उचटलून धरला असून ज्या विमानाच अपघात झाली त्याची कंनी व्हीएस आर यांच्यावरही त्यंनी संशयाचे बोट उठवले.
गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे या मुद्यावरून सातत्याने बोलत असून या अपघाताची सविस्तर चौकशी व्हावी, व्हीएस कंपनीचे मालक, काही सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध या विषयांवरही त्यांनी अनेक पुरावे मांडू संशय व्यक्त केला आहे. एवढंच नव्हे तर या प्रकरणात आता रोहित पवार यांनी मोठं पाऊल उचललं असून त्यांनी डीजीसी विरोधातच गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. काल रोहित पवार व व अमोल मिटकरी हे मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन येथे गेले होते. अजित पवार विमान अपघात प्रकरणात डीजीसीए विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी ते तिथे दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तेथे पोहोचले. मात्र पोलिसांनी डीजीसीएविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने रोहित पवारांची बाचाबाची झाली.
आज बारामती पोलिस ठाण्यात तक्रार करणार दाखल
पोलिसाँशी बाचाबाची, वाद झाल्यानंतर अखेर रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. सकाळी ते व युगेंद्र पवार तसेच अजित पवार यांचे चुलत बंधू, राजेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्याजवळ पोहोचले. तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवार यांचे हजारो समर्थकही, कार्यकर्ते मोठ्य संख्येने उपस्थित होते. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी , न्याय मिळाव या मागणीसाठी हजारो समर्थक, कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केलं. अजित पवार यांची पोस्टर्स घेऊन सर्वांनी पोलिस ठाण्यासमोर अक्षरश:ठिय्या दिला. न्यायासाठी , सत्यासाठी आपण आलो असल्याची भूमिका सर्वांनी मांडली आहे.
अमर रहे अमर रहे, अजित दादा अमर रहे… रोहित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, गुन्हा दाखल झाल्याशिवाय हलणार नाही अशा विविध घोषणांनी पोलिस स्टेशनचा परिसर दुमदुमून गेला होता.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply