• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajit Doval : युद्धाची स्थिती, प्रचंड तणाव, भारताचे खरे ‘धुरंधर’ NSA अजित डोवाल महत्वाच्या मिशनवर

February 4, 2026 by admin Leave a Comment


मिडिल-ईस्टमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल सिक्योरिटी एडवायजर (NSA) अजित डोवाल सौदी अरेबिया दौऱ्यावर आहेत. डोवाल रियादमध्ये आपल्या सौदी समकक्षासोबत चर्चा करणार आहेत. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर त्यांच्या दौऱ्याची घोषणा केली आहे. यात डोवाल अधिकृत दौऱ्यासाठी रियाद येथे आले आहेत, असं म्हटलय. भारतीय राजदूत सुहेल एजाज खान यांनी एअरपोर्टवर त्यांचं स्वागत केलं. सौदी अरेबियाचे राजकीय विषयाचे उप मंत्री सऊद अल-साती सुद्धा तिथे उपस्थित होते. साती भारतात सौदी अरेबियाचे राजदूतही होते.

अमेरिकेने मिडिल-ईस्टमध्ये आपला लष्करी दबाव वाढवला आहे. त्यांनी USS अब्राहम लिंकन हा विमानवाहू युद्ध नौकेवरील स्ट्राइक ग्रुप अरबी समुद्रात तैनात केला आहे. मंगळवारी अमेरिकी नौदलाने यूएसएस अब्राहम लिंकनच्या दिशेने येणारी इराणी ड्रोन पाडली. अमेरिकी सेंट्रल कमांडने ही माहिती दिली. सेंट्रल कमांडने सांगितलं की, ड्रोन आक्रमकतेने विमानवाहू युद्धनौकेच्या दिशेने येत होतं. इराणने त्यांच्या न्यूक्लियर प्रोग्रॅमबाबत अमेरिकेशी डील करावी असा दबाव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टाकत आहेत.

अजित डोवाल पहिले सीनियर अधिकारी

अजित डोवाल यांच्या दौऱ्यात द्विपक्षीय संबंधांसोबत क्षेत्रीय सुरक्षा स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये आधीपासून सुरक्षा संबंध होते. आता एका नवीन करारानंतर ते अधिक भक्कम होणार आहेत. पाकिस्तान-सौदीमध्ये हा करार झाल्यानंतर हा दौरा होत आहे. या डीलनंतर भारताच्यावतीने सौदी अरेबियाचा दौरा करणारे अजित डोवाल पहिले सीनियर अधिकारी आहेत.

या दौऱ्याचं महत्व काय?

डोवाल यांचा हा दौरा संयुक्त अरब अमीरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद यांच्या भारत दौऱ्यानंतर होत आहे. जायद अलीकडेच भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी दोन्ही बाजूंनी रणनितीक संरक्षण भागीदारीला अंतिम रुप देण्याच्या योजनेची घोषणा केली. द्विपक्षीय व्यापार दुप्पट करुन तो $200 अब्ज डॉलरपर्यंत घेऊन जाण्याचं लक्ष्य निर्धारित केलं.

त्यात सौदी अरेबियाही सहभागी

28 जानेवारीला सौदी अरेबियाने द्विपक्षीय सुरक्षा वर्किंग ग्रुपच्या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि लाल किल्ल्याजवळील दहशतवादी घटनेचा निषेध केला होता. दोन्ही बाजूंनी सुरक्षा सहकाऱ्याची समीक्षा केली व दहशतवाद्यांपासून असलेल्या धोक्यांबद्दल चर्चा केली. नवी दिल्लीत भारत आणि अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्यात सौदी अरेबियाही सहभागी झाला होता.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वरुथिनी एकादशीला पडणार पंचकांची सावली, जाणून घ्या कोणत्या कर्मांनी मिळेल पुण्य
  • US Iran Peace Talks In Islamabad : इराण जिवंत आहे फक्त… ट्रम्प यांची पुन्हा धमकी; शांतीवार्ते आधीच दिलं टेन्शन; आता…
  • Hormuz Crisis : जगाला दणका देणाऱ्या इराणने हॉर्मुज ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांकडून टोलपोटी आतापर्यंत किती लाख डॉलर्स वसूल केलेत?
  • तुरटीचा फक्त एक छोटा खडा, अन् उन्हाळ्यातील ‘या’ समस्यांपासून मिळेल आराम, जाणून घ्या
  • वायफाय देखील तुमचे भाग्य उजळवू शकतो, फक्त राउटर बसवताना या गोष्टी ठेवा लक्षात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in