
भारतीय बाजारपेठेत AI+ Nova 2 सिरीजचे दोन नवे फोन लाँच करण्यात आले आहेत. या लाइनअपमध्ये AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G यांचा समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोन्स पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या नवीन सिरीजमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 6000 mAh बॅटरी आहे. चला, दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत, विक्रीची तारीख आणि वैशिष्ट्ये आजच्या लेखात जाणून घेऊयात.
AI+ Nova 2 5G ची भारतात किंमत
भारतीय बाजारपेठेत या नवीन स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंटची किंमत 8 हजार 999 रूपये आहे. कंपनीने अद्याप 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत जाहीर केलेली नाही.
त्यातच या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा फोन ब्ल्यू, ब्लॅक, पिंक, ग्रीन, आणि पर्पल या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.
AI+ Nova 2 Ultra 5G ची भारतात किंमत
या डिव्हाइसच्या 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 14 हजार 999 रूपये ठेवण्यात आली आहे. तर या प्रभावी किंमतीमध्ये बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनसचा समावेश असू शकतो. कंपनीने 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत जाहीर केलेली नाही. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास हा हँडसेट 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हे डिव्हाइस ब्ल्यू, ब्लॅक, रेड, ग्रीन, आणि पर्पल रंगांमध्ये खरेदी करू शकता.
AI Plus Nova 2 Ultra वैशिष्ट्य
स्क्रीन: अल्ट्रा मॉडेलमध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आणि कमाल ब्राइटनेस 2500 nits आहे.
चिपसेट: अल्ट्रा मॉडेलमध्ये 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 चिपसेटचा वापर केला जातो.
कॅमेरा: अल्ट्रा मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सलचा सोनी IMX752 कॅमेरा सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे.
AI Plus Nova 2 5G वैशिष्ट्य
स्क्रीन: या फोनमध्ये 6.74-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे.
चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये युनिसॉक टी8200 ऑक्टा कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
कॅमेरा: या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे, तर समोरच्या बाजूला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.
सामान्य वैशिष्ट्य
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये पॉवरफूल 6000mAh बॅटरी आहे, फरक एवढाच की अल्ट्रा मॉडेलमध्ये 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे, तर स्टँडर्ड मॉडेलमध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे.
Leave a Reply