• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

AI Impact Summit : एआय समिटच्या निमित्तानं भारत-यूएई संबंधांना नवी चालना; क्राउन प्रिंस खालिद यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

February 19, 2026 by admin Leave a Comment


AI Impact Summit च्या निमित्तानं अबू धाबीचे क्राउन प्रिंस शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि युएईमध्ये धोरणात्मक सहकार्य, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान वाढवण्यासाठीच्या प्रयत्नावर भर देण्यात आला. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत तंत्रज्ञान हेच आता द्विपक्षीय संबंधांचे प्रमुख आधारस्तभ असतील असं या बैठकीमध्ये स्पष्टपणे दिसून आलं. क्राउन प्रिंस शेख खालिद हे 18 आणि19 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर आहेत, आणि आज ते दिल्लीमध्ये सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देखील सहभागी झाले आहेत.

क्राउन प्रिंस शेख खालिद हे दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी ते 2024 मध्ये देखील भारतात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते भारत दौऱ्यावर असून आज एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी झाले आहेत. तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि धोरणात्मक सहकार्य या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची त्यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांनी भारत आणि युएईमधील व्यापक धोरणात्मक भागिदारीचा आढावा घेतला, तसेच व्यापार, ऊर्जा, आणि गुंतवणूक या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सीईपीए कराराला चार वर्ष पूर्ण झाले आहेत, या काळात व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये आलेल्या तेजीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या या बैठकीमध्ये अवकाश तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि नवोन्मेष यासारख्या गोष्टींमध्ये सहकार्य वाढवण्यावर देखील भर देण्यात आला आहे, गुंतवणूक वाढवण्यावर देखील चर्चा करण्यात आली.

दरम्यान यावेळी  अबू धाबीचे क्राउन प्रिंस शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी एआय इम्पॅक्ट समिटच्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी भारतानं देखील भविष्यात आधी  स्वित्झर्लंड आणि नंतर यूएईमध्ये एआय समिट आयोजित करण्याच्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in