• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा आणखी एक अर्धशतकी विक्रम, फक्त 14 चेंडूत तोडफोड

January 25, 2026 by admin Leave a Comment


न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पुन्हा एकदा दिसून आला. अभिषेक शर्मा न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्यामुळे कुठे चेंडू टाकायचा असा प्रश्न न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पडला होता. (Photo- BCCI Twitter)

गुवाहाटी येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अभिषेकने फक्त 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं. डावखुरा फलंदाज इशान किशनचा विक्रम अवघ्या 48 तासांत मोडत भारतासाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. (Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्माने 14 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 364.29 चा होता. भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये झळकावलेलं दुसरं वेगवान शतक आहे. 12 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड युवराज सिंगच्या नावावर आहे. (Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्माने 20 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. यात त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याने सूर्यकुमार यादवसह तिसऱ्या विकेटसाठी 40 चेंडूत नाबाद 102 धावांची भागीदारी केली. (Photo- BCCI Twitter)

रोहित शर्माने न्यूझीलंड विरूद्ध टी20 मालिकेत सर्वाधिक षटकार मारले होते. त्याने एका टी20 मालिकेत 10 षटकार मारले होते. अभिषेक शर्माने आता त्याला मागे टाकत 13 षटकारांसह अव्वल स्थान गाठलं आहे. (Photo- BCCI Twitter)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता खरी मजा येणार..; स्वानंदीकडून समरला ही ऑफर, 28 दिवसांत तेजश्री प्रधानच्या मालिकेतील खेळ आटपणार
  • सुप्रिया सुळे यांचे नवे व्हॉट्सअप स्टेट्स, थेट बारामतीचा उल्लेख, मोठे संकेत, अजित पवार यांच्यासोबतचे…
  • IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातलाय, तरीही टीम इंडिया 15 तारखेला श्रीलंकेमध्ये का जाणार? कारण काय?
  • Devendra Fadnavis : विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट ‘तो’ दावाच खोडला!
  • Dhurandhar : चाहत्यांच्या तक्रारी येताच नेटफ्लिक्सने ‘धुरंधर’मध्ये केला मोठा बदल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in