• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhishek Bachchan : ॲक्टिंग नव्हे, बिग बींच्या मुलाला निवडायचं होतं हे करिअर, अभिषेकने अचानक का बदलला निर्णय ?

February 5, 2026 by admin Leave a Comment


Abhishek Bachchan Birthday Special : झगमगाटी विश्व म्हणून बॉलिवूड नेहमी प्रसिद्ध असतं. इथलं अनेकांना आकर्षणही वाटत. पण बॉलीवूडमध्ये स्टारकिड असणं हे नेहमीच सोपं असतं असं नाही. नेपोकिड्सना एंट्री सहज मिळ शकते, पण टिकून राहता की नाही हे तुमच्यावरच अवलंबून असतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन (Abhisheck Bachchan), त्याचं आयुष्य बाहेरून ग्लॅमरस वाटत असले तरी तेही संघर्ष आणि कठीण निर्णयांनी भरलेलं आहे. बच्चन खानदानाचं नाव घेऊन, आई-वडिलांच्या पवालावर पाऊल टाकून अभिषेकने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला खरा पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की अभिषेकने लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले नव्हतं. चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, त्याला एक यशस्वी व्यावसायिक बनायचे होते आणि कॉर्पोरेट जगात स्वतःचे नाव कमवायचे होतं. तेच त्याचं स्वप्न होतं.

5 फेब्रुवारी 1976 साली मुंबईत अभिषेकचा जन्म झाला. शहेनशाह अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांचा तो धाकटा मुलगा आहे. चित्रपट कुटुंबात जन्माला येऊनही अभिषेकचे संगोपन सामान्य आणि शिस्तबद्ध वातावरणात झालं. प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्याला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आलें, जिथे त्याने बिझनेस मॅनैजमेंटचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मल्टीनेशनल कंपनीमध्ये काम करण्याचं आणि एक यशस्वी कॉर्पोरेट व्यावसायिक बनण्याचं अभिषेकचं स्वप्न होतं.

या कारणामुळे सोडला अभ्यास

मात्र परदेशात असतानाही अभिषेकने त्याच्याावडिलांच्या आयुष्यातील कठीम काल पाहिले, तेव्हा ते आर्थिक संघर्ष करत होते, करिअरचाही बॅज पॅच सुरू होता. वडिलांना इतक्या अडचणींशी झुंजताना पाहून अभिषेकचं मन बदलू लागलं, मपरिवर्तन झालं. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे आपला मार्गही सिनेमाच (चित्रपटसृष्टी) आहे का याचा विचार करण्यास त्याला भाग पडलं. त्याच दरम्यान त्याने शिक्षण अरअधवट सोडलं आणि तो भारतात परत आला.

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अखेर 2000 साली अभिषेक बच्चनने जे.पी. दत्ता यांच्या “रिफ्यूजी” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही, परंतु अभिषेकच्या साधेपणाने आणि पडद्यावरच्या उपस्थितीने प्रेक्षकांचे लक्ष नक्कीच वेधून घेतले. मात्र नंतर त्याच्या करिअरचा सुरूवातीचा काळ खूपच संघर्षाचा होता. त्याचे अनेक चित्रपच लागोपाठ फ्लॉप झाले आणि स्टारकिड असूनही तो अपयशी ठरल्याची टीका झाली. वडील अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाणारी तुलना, हे त्याच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बनले.

पण काळ पुढे सरकत गेला तसं अभिषेकने त्याचं नाणं खणखणीत वाजतंय हे सिद्ध केलं. ‘युवा’, ‘बंटी और बबली’, ‘धूम’ फ्रेंचाइजी, ‘गुरु’ आणि ‘दिल्ली-6’ सारख्या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः “गुरु” चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं, समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. आज, अभिषेक बच्चन केवळ एक अभिनेताच नाही तर एक जाणकार गुंतवणूकदार आणि बिझनेस माइंडेड पर्सनालिटीदेखील आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 5 वा 8 नव्हे तब्बल 14 लेन : भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस- वे, ट्रॅफीकची कटकट नाही की रेड सिग्नलची अडचण नाही
  • Chanakya Niti : या दोन गोष्टींना घाबरलात तर संपलात म्हणून समजा, चाणक्य यांनी सांगितलं आयुष्यातील कटू सत्य
  • घरात ‘या’ देवी-देवतांचे फोटो ठेवणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या
  • RCB vs DC Final: दिल्लीचा फायनलमध्ये धमाका, कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्सचं विक्रमी अर्धशतक, आरसीबी विरुद्ध काय केलं?
  • Ajit Pawar Death: दादा माझ्याबद्दल जे दोन शब्द बोलेले ते…, असं काय म्हणाली गौतमी पाटील?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in