• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

9 मिनिटांचं हे गाणं गायल्यानंतर गायकाच्या तोंडातून आलं होत रक्त, थिएटरमध्ये ऐकताच रडायचे लोक

February 3, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Song : सध्या ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असताना, अनेकांना 1997 साली प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्या काळात या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच यश मिळवलं नव्हतं तर संपूर्ण देशात देशभक्तीची एक लाट उसळली होती. चित्रपटासोबतच त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला होता.

या चित्रपटातील ‘संदेशे आते हैं’ हे गाणं आजही ऐकलं की अनेकांच्या डोळ्यांत अश्रू येतात. हे गाणं केवळ एक संगीत रचना नाही तर सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या भावना, वेदना, आठवणी आणि कुटुंबापासून दूर असण्याचं दुःख व्यक्त करणारी हृदयस्पर्शी कविता ठरली होती.

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या जेपी दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ या चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, पुनीत इस्सर आणि सुदेश बेरी यांनी साकारलेली पात्रे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अभिनेत्री राखी आणि पूजा भट्ट यांनीही आपल्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या होत्या.

आता सनी देओल पुन्हा एकदा ‘बॉर्डर 2’ मधून मोठ्या पडद्यावर आपली धाक दाखवत असून, प्रेक्षकांना पुन्हा तोच 1997 चा जोश आणि देशभक्तीची भावना अनुभवायला मिळत आहे. यावेळी चित्रपटात दिलजीत दोसांझ देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. ‘बॉर्डर 2’ मधील गाणीही प्रेक्षकांना पसंतीस उतरली असली तरी पहिल्या ‘बॉर्डर’मधील गाण्यांची भावनिक उंची आजही अतुलनीय आहे.

9 मिनिटांचं पण काळजाला भिडणारं गाणं

‘बॉर्डर’मधील प्रत्येक गाणं लोकप्रिय ठरलं होतं, मात्र जवळपास 9 मिनिटांचं ‘संदेशे आते हैं’ हे गाणं थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना अक्षरशः रडवून गेलं होतं. इतकं लांब असूनही हे गाणं कुठेही कंटाळवाणं वाटत नव्हतं. उलट प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करून जात होती. या गाण्याशी संबंधित एक धक्कादायक आणि भावूक करणारा किस्सा अलीकडे पुन्हा चर्चेत आला आहे.

एका पॉडकास्टमध्ये स्वतः अनु मलिक यांनी उघड केलं होतं की, ‘संदेशे आते हैं’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांनी सतत गाणं गायलं, अनेक तास मेहनत घेतली. या ताणामुळे आणि अतिश्रमामुळे त्यांना इतका थकवा आला की, बाथरूममध्ये गेल्यावर थुंकताना त्यांच्या तोंडातून रक्त निघालं. नंतर डॉक्टरांनी सांगितलं की, जास्त गाणं आणि मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली होती. मात्र, त्या मेहनतीचं फळ असं गाणं ठरलं जे आजही ऐकणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 12 वर्षांची प्रेमकहाणी, घरच्यांचा लग्नाला नकार, लग्नासाठी या अभिनेत्याने केला प्रचंड संघर्ष, आज आहे प्रसिद्ध अभिनेता
  • लोकसभेत मोठा गोंधळ, महाराष्ट्रातील या खासदारासह 8 जणांवर मोठी कारवाई, थेट निलंबन
  • मुंबई-पुणे प्रवास आता फक्त 48 मिनिटांमध्ये, प्रवाशांना मोठा दिलासा
  • Ajit Pawar Post | अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
  • Big Losers: अख्खा संघ 50 धावांच्या आत गारद, T20 विश्वचषकात सर्वात कमी धावा करणारे संघ कोणते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in