• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

8 लग्न, 7 घटस्फोट आणि 74 कोटींचा तो ‘ताजमहल’ हार… जगातील पहिल्या कोट्यधीश अभिनेत्रीची अद्भुत कहाणी

February 5, 2026 by admin Leave a Comment


असं म्हणतात की अभिमान आणि गौरवाचं सातत्य जोपर्यंत सुरु आहे, तोपर्यंत सर्वत्र फक्त आपल्या यशाच्या चर्चा सुरु राहतात. पण जेव्हा सर्वकाही धुळीस मिळतं, तेव्हा काहीच पूर्वीसारखं राहत नाही. राहतात तर ते फक्त फक्त किस्से… असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. जिला हॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचं किताब मिळालं… त्यानंतर या अभिनेत्री बॉक्स ऑफिसची व्याख्याच पुर्णपणे बदलली. ही जांभळ्या डोळ्यांची सुंदरता केवळ पडद्यापुरती मर्यादित नव्हती; तिच्या राजेशाही वैभवाच्या कहाण्या आजही ऐकल्या आणि वाचल्या जातात. आज आपण तिची अद्भुत कहाणी जाणून घेऊया…

हॉलिवूड आयकॉन एलिझाबेद टेलर (Elizabeth Taylor) हिचा जन्म 27 फेब्रुवारी 1932 रोजी लंडन येथे झाला. तिचं पूर्ण नाव एलिझाबेद रोजमंड टेलर असं होतं. संपूर्ण जगात तिची जांभळ्या डोळ्यांची आणि सौंदर्यवती म्हणून ओळख होती. पण एलिझाबेद हिने सिनेमात त्सुनामी आणण्याचं काम केलं. ती 1 कोटी डॉलर्सची फी मिळवणारी पहिली हॉलिवूड अभिनेत्री होती. त्यानंतर टेलरने अधिक परिपक्व भूमिका निवडण्यास सुरुवात केली.

‘लाइफ विद फादर’ (1947), ‘फादर ऑफ द ब्राइड’ (1950) आणि ‘ए प्लेस इन द सन’ (1951) अशा सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत एलिझाबेद हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, 50 – 70 दशकापर्यंत म्हणजे जवळपास 13 वर्षांपर्यंत तिने बॉक्स ऑफिसवर राज्य केलं.

8 लग्न आणि 7 घटस्फोटांमुळे अभिनेत्री चर्चेत…

एलिझाबेथचे लग्न हा जगात सर्वाधिक चर्चेचा विषय होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिने एकदा किंवा दोनदा नाही तर आठ वेळा लग्न केलं.
कॉनराड हिल्टन ज्युनियर (1950–51): हॉटेल साम्राज्याचे वारसदार हिल्टनशी तिचे लग्न फार काळ टिकलं नाही. टेलरने त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप कले.

मायकल वाइल्डिंग (1952–57): एलिझाबेद हिने मायकल यांच्यासोबत लग्न केलं. पण हे लग्न देखीर फार काळ टिकलं नाही. घटस्फोटाच्या पूर्वी त्याची दोन मुलं होती. मायकल वाइल्डिंग ज्युनियर आणि क्रिस्टोफर वाइल्डिंग…

माईक टॉड (1957–58): निर्माते मईक यांच्याबद्दल अभिनेत्रीने लिहिलं होतं, देव साक्ष आहे… मी प्रचंड प्रेम करत होती. त्यांच्या देखरेखीखाली माझा स्वाभिमान आणि स्वतःची प्रतिमा प्रचंड वाढली.” त्यांना एक मुलगी होती, लिसा टॉड. माईकचा विमान अपघातात मृत्यू झाला.

एडी फिशर (1959–64): त्यांचं नातं तेव्हा सुरु झालं तेव्हा एडी विवाहित होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाले होतं. दोघांनी ‘बटरफिल्ड 8’ मध्ये एकत्र काम केलं होतं. पण त्यानंतर लेटर हिने एडी यांची साथ साडण्याचा निर्णय घेतला.

रिचर्ड बर्टन (5 आणि 6 वं लग्न): हे तिचं सर्वात प्रसिद्ध आणि हिंसक प्रेमप्रकरण होतं. तिने बर्टनशी दोनदा लग्न केलं आणि दोनदा घटस्फोट घेतला. रिचर्ड बर्टननेच तिला ताजमहालचा हार भेट दिला.

जॉन वार्नर (1976–82): यांची भेट एका ‘ब्लाइंड डेट’ दरम्यान झाली होती. लग्नानंतर, टेलरने वॉर्नरला अमेरिकन सिनेटरीय निवडणूक जिंकण्यास मदत केली, परंतु तिला राजकारण्याच्या पत्नीचं बंधनकारक जीवन आवडलं नाही.

लॅरी फोर्टेंस्की (1991–96): टेलरची भेट लॅरी नावाच्या बांधकाम कामगाराशी एका ड्रग्ज व्यसन उपचार क्लिनिकमध्ये झाली. घटस्फोटानंतर टेलरने सांगितलं की, ती पुन्हा कधीही लग्न करणार नाही.

दुसरा पती रिचर्ड बर्टनने टेलरला भेट म्हणून दिलेला ताजमहालचा हार हा तोच हार होता, ज्याची सध्या चर्चा होत आहे. नूरजहाँच्या या नेकलेसवर हॉलिवूडने दावा केला होता. दुसरीकडे, टेलरला दागिने घालण्याची खूप आवड होती. एलिझाबेथ टेलर हिचं 2011 मध्ये निधन झालं परंतु तिने एक असं साम्राज्य सोडलं जे कधीही विसरता येणार नाही. पण तिच्या मृत्यूनंतरही चाहते अभिनेत्रीची आठवण काढतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारत जगासाठी आशेचा किरण, सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, मोदींनी सांगितलं विकासाचं व्हिजन
  • धनप्राप्तीचे स्वप्न पडणे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
  • जिओ ब्लॅकरॉकने लाँच केले नवे फीचर, गुंतवणुकीबाबत मिळेल वैयक्तिक सल्ला, जाणून घ्या
  • WPL Final 2026 : जॉर्जिया-स्मृतीची ऐतिहासिक भागीदारी, RCB दुसऱ्यांदा चॅम्पियन्स, दिल्ली फायनलमध्ये सलग चौथ्यांदा अपयशी
  • GK : भारतील एकमेव नदी जी विरुद्ध दिशेला वाहते? नाव काय आहे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in