• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

70 च्या दशकातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, 28 किलो सोनं, 1250 किलो चांदी अन् 10500 साड्या, नेटवर्थ 900 कोटी

March 22, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याबरोबरच प्रचंड संपत्तीमुळेही चर्चेत राहिल्या आहेत. आजच्या काळात सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हटलं की जूही चावलाचं नाव पुढे येतं. मात्र, एक काळ असा होता की भारतीय चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीची संपत्ती इतकी अफाट होती की आजच्या अनेक मोठ्या अभिनेत्रीही तिच्यासमोर फिक्या पडतात.

ही अभिनेत्री म्हणजे तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज अभिनेत्री जे. जयललिता. त्यांनी केवळ चित्रपटसृष्टीतच नाही तर राजकारणातही मोठं यश मिळवलं. ‘अम्मा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांनी आपल्या अभिनय आणि राजकीय कारकिर्दीतून प्रचंड संपत्ती कमावली.

जयललिता यांनी लहान वयातच बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी एम. जी. रामचंद्रन यांना आपला गुरु मानलं आणि त्यांच्यासोबत तब्बल 28 चित्रपटांमध्ये काम केलं. तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील सुमारे 140 चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे, हिंदीत त्यांनी फक्त एकच चित्रपट केला ‘इज्जत’. या चित्रपटात त्यांच्यासोबत धर्मेंद्र आणि तनुजा होते.

आयकर विभागाची छापेमारी

आपल्या यशस्वी फिल्मी करिअरच्या शिखरावर असताना अवघ्या 31व्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला आणि राजकारणात प्रवेश केला. पुढे त्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आणि लोकप्रिय नेत्या म्हणून ओळख निर्माण केली.

जयललिता यांच्या संपत्तीबाबत अनेकदा चर्चा झाली. त्या काळातील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. 1997 साली त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. त्या वेळी त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची छापेमारी झाली होती, ज्यात हजारो साड्या, मोठ्या प्रमाणात सोने आणि इतर मौल्यवान वस्तू आढळल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या मते त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीपेक्षा खूप अधिक संपत्ती त्यांनी जमवली होती.

इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

त्यांच्या संपत्तीची तुलना केली असता, त्या काळात त्या आजच्या अनेक श्रीमंत अभिनेत्रींपेक्षा अधिक श्रीमंत मानल्या जात होत्या. त्यामुळेच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक मानले जाते.

जे. जयललिता यांनी लग्न केले नव्हते आणि त्यांना अपत्यही नव्हते. त्यांनी आयुष्यभर आपल्या करिअरला आणि सार्वजनिक जीवनाला प्राधान्य दिले. 2016 साली, वयाच्या 68व्या वर्षी त्यांचे निधन झाले. जयललिता यांचे आयुष्य हे संघर्ष, यश, सत्ता आणि संपत्ती यांचा अनोखा संगम होते. अभिनेत्रीपासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in