• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

52 कोटींचे 194 कोटी करणारी ‘ती’ प्रसिद्ध अभिनेत्री अचानक झाली गायब, आज कुठे आणि कशी जगतेय?

April 12, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये प्रत्येक वर्षी अनेक नवीन चेहरे दिसतात. काही पहिल्या सिनेमातूनच स्वतःची भक्कम ओळख तयार करतात, तर काही कुठे गायब होतात काही कळत देखील नाही. एवढंच नाही तर, असे देखील अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी फार कमी काळात विक्रम रचले. चाहत्यांनी त्यांना भरभरुन प्रेम देखील दिलं. पण आज ते सेलिब्रिटी कुठे आहेत, याबद्दल काहीही माहिती नाही. पण चाहते आजही अशा सेलिब्रिटींना विसरलेले नाही… बॉलिवूडमध्ये अशीच एक अभिनेत्रीने होऊन गेली, जिने एका रात्रीच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 52 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या तिच्या सिनेमाने तब्बल 194 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्री अचानक गायब झाली.

सध्या ज्या अभिनेत्रीच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री असिन थोट्टुमकल आहे. ‘गजनी’ या सुपरहीट सिनेमात अभिनेत्रीने दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 52 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने 194 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

‘गजनी’ सिनेमात अभिनेत्रीने ‘कल्पना’ ही भूमिका साकारली होती. असिन हिने तिच्या साधेपणाने आणि उत्तम अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली आहे. पण आजही अभिनेत्री कोणी विसरू शकलेलं नाही.

असिन हिने बॉलिवूड आणि साउथ सिनेविश्वात स्वतःचं नाव मोठं केलं. अभिनेता सलमान खान याच्यासोबत ‘रेडी’ सिनेमात देखील अभिनेत्री झळकली. पण यशाच्या शिखरावर पोहोचलेली असिन अचानक गायब झाली आहे… 2015 मध्ये असिन हिचा शेवटचा सिनेमा ‘ऑल इज वेल’ प्रदर्शित झाला. त्यानंतर 2016 मध्ये अभिनेत्रीने राहुल शर्मा याच्यासोबत लग्न केलं आणि बॉलिवूडचा निरोप घेतला.

त्यानंतर 2017 मध्ये अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य बदललं… तिने पूर्ण वेळ कुटुंबाला देण्यास सुरुवात केली… तिनं संपूर्ण लक्ष कुटुंबावर केंद्रित केलं आणि चित्रपट, पार्ट्या व प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवलं. नुकताच, तिच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त, तिचे जुने फोटो समोर आले, ज्यामुळे चाहते तिच्या जुन्या आठवणींमध्ये रमले.

सांगायचं झालं तर, असिन आता तिच्या कुटुंबियांसोबत दिल्ली आणि मुंबईत राहते. ती आता कोणत्या इव्हेंटमध्ये दिसत नाही. कोणत्या पार्टीमध्ये दिसत नाही. सोशल मीडियावर देकील असिन सक्रिय नसते… पण आजही ‘गजनी’ सिनेमातील कल्पना प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतातील श्रीमंत गायिकांमध्ये आशा भोसले यांचा समावेश, जाणून घ्या संपत्ती
  • Nashik IT Company | मोठी बातमी! नाशिकमध्ये महिलांचे गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्या डेटाने खळबळ
  • Asha Bhosle : आशा भोसले यांचं निधन कशामुळे? डॉक्टरांनी सांगितलं कारण
  • आदित्य ठाकरे यांची निष्ठा तपासणार का? कंम्बोज भेटीवरून शिंदे गोटातून धडाडली तोफ, जिव्हारी लागणाऱ्या प्रश्नाला उद्धव सेना उत्तर देणार?
  • संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला देत म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in