• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

50MP कॅमेऱ्याने सुसज्ज असलेल्या Samsung कंपनीने एकाच वेळी लाँच केले दोन स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

March 26, 2026 by admin Leave a Comment


सॅमसंग कंपनीने भारतात त्यांच्या नवीन ‘ए-सिरीज’चा भाग म्हणून Samsung Galaxy A57 5G आणि Samsung Galaxy A37 5G हे दोन नवीन स्मार्टफोन एकाच वेळी लाँच केले. या स्मार्टफोन्समध्ये मोठे 6.7-इंचाचे अमोलेड डिस्प्ले, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि पॉवरफुल 5000mAh बॅटरी आहे. कंपनीने या फोन्समध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आणि नवीनतम सॉफ्टवेअर सपोर्टदेखील दिला आहे. विशेष म्हणजे, सॅमसंग या डिव्हाइसेससाठी सहा वर्षांच्या अपडेट्सचे आश्वासन देत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या दोन्ही फोनची किंमत, फिचर्स आणि उपलब्धतेबद्दल जाणून घेऊयात.

Samsung Galaxy A57 5G, A37 5G: किंमत किती आहे?

भारतात सॅमसंग गॅलेक्सी A57 5G च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 56,999 रूपयांपासून सुरू होते. तर 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 62,499 रूपये आहे. सॅमसंग गॅलेक्सी A37 5G च्या वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 41,999 रूपयांपासून सुरू होऊन 52,999 रूपयांपर्यंत जाते. दोन्ही फोन ॲमेझॉनवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून त्यांची डिलिव्हरी 2 एप्रिलपासून सुरू होईल.

Samsung Galaxy A57 5G, A37 5G: फिचर्स

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED+ डिस्प्ले आहे. कंपनीने अद्याप प्रोसेसरच्या वैशिष्ट्यांची पुष्टी केलेली नाही. तथापि, सॅमसंग गॅलेक्सी A57 5G मध्ये एक्सिनोस 1680 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, तर सॅमसंग गॅलेक्सी A37 5G मध्ये एक्सिनोस 1480 चिप असू शकते. दोन्ही डिव्हाइसेसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. ते One UI 8.5 आणि अँड्रॉइड 16 वर चालतात.

Samsung Galaxy A57 5G, A37 5G: कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि सॅमसंग गॅलेक्सी A37 5G या दोन्हीमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. A57 मध्ये 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे, तर A37 मध्ये 8MP चा सेन्सर आहे. दोन्हीमध्ये 5MP चा मॅक्रो कॅमेरा देखील आहे. समोरच्या बाजूला 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. ऑब्जेक्ट इरेझर, बेस्ट फेस आणि सर्कल टू सर्च यांसारखी AI फिचर्स वापरकर्त्याचा अनुभव अधिक चांगला करतात.

Samsung Galaxy A57 5G, A37 5G: बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मोठी 5000mAh बॅटरी आहे, जी अंदाजे दोन दिवस टिकते असा दावा कंपनीने केला आहे. तर हे फोन्स सुपर फास्ट चार्जिंग 2.0 ला सपोर्ट करतात. दोन्ही फोन्स IP68 रेटेड आहेत, म्हणजेच ते पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहेत. त्यांमध्ये नॉक्स व्हॉल्ट सुरक्षा फिचर्स देखील आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in