• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

50 वर्षांपूर्वीचा ‘शोले’ला टक्कर देणारा चित्रपट, कमाईने रचला होता इतिहास, बनवण्यासाठी निर्मात्याने विकले होते घर

February 4, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Movies : बॉलिवूडमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे ‘शोले’. या चित्रपटाला टक्कर देणारा 50 वर्षांपूर्वीचा चित्रपट ज्याला बनवण्यासाठी निर्मात्यांना घर विकावे लागले. त्याच चित्रपटाने प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात कमाई केली. आजपासून सुमारे 50 वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीने एक अभूतपूर्व क्षण अनुभवला. एकीकडे अ‍ॅक्शन, ड्रामा आणि मैत्रीची अजरामर कहाणी सांगणारा ‘शोले’ तर दुसरीकडे भक्ती, श्रद्धा आणि आस्थेचा रंग चढवणारा ‘जय संतोषी मां’ या दोन्ही चित्रपटांनी एकाच काळात प्रदर्शित होऊन बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या दोन चित्रपटांनी केवळ प्रेक्षकांचे मन जिंकले नाही तर अनेक विक्रम प्रस्थापित करत भारतीय सिनेमाच्या इतिहासात अढळ स्थान निर्माण केले.

रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा आजही भारतीय सिनेमातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार आणि अमजद खान यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सजलेला हा मल्टी-स्टारर चित्रपट म्हणजे अभिनय, कथा आणि दिग्दर्शन यांचा परिपूर्ण संगम होता.
आर. डी. बर्मन यांच्या संगीताने ‘शोले’ला वेगळीच उंची मिळवून दिली.

‘शोले’ला टक्कर देणाऱ्या चित्रपटाची कमाई

दुसरीकडे, विजय शर्मा दिग्दर्शित ‘जय संतोषी मां’ हा कमी बजेटमध्ये बनलेला धार्मिक चित्रपट असूनही त्याने ‘शोले’सारख्या भव्य सिनेमाला तगडी टक्कर दिली. कांता गुप्ता, अनीता गुहा आणि भारत भूषण यांसारख्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट एका श्रद्धाळू स्त्रीची कथा सांगतो, जी आपल्या भक्ती आणि आस्थेच्या बळावर जीवनातील सर्व अडचणींवर मात करते.

‘जय संतोषी मां’च्या यशामागे गाण्यांचा फार मोठा वाटा होता. चित्रपटातील प्रत्येक गाणे सुपरहिट ठरली. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सिनेमागृहांमध्ये एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला. प्रेक्षक चित्रपट पाहताना आरती करू लागले, चप्पल बाहेर काढून थिएटरमध्ये जात होते आणि पडद्यावर पैशांची उधळण करत होते.

‘जय संतोषी मां’ हा अत्यंत कमी खर्चात बनवण्यात आला होता, मात्र त्याने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई केली. हा चित्रपट तब्बल 45 आठवड्यांहून अधिक काळ सिनेमागृहात चालला. निर्माते सतरम रोहरा, जे चित्रपट पूर्ण होईपर्यंत जवळपास दिवाळखोरीत गेले होते, ते चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या पहिल्याच आठवड्यात कोट्यधीश बनले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in