• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

50 लाखांचं बजेट, कमाई थेट 100 कोटी पार; ब्लॉकबस्टर चित्रपट आता ओटीटीवर

March 5, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर कायम बोलबाला पहायला मिळतो. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100, 500 आणि 1000 कोटी रुपयांचा टप्पासुद्धा पार करतात. बिग बजेट, मल्टिस्टारर, व्हीएफएक्स आणि तगडी स्टारकास्ट यांच्या जोरावर प्रेक्षकांना आकर्षित केलं जातं. परंतु काही स्थानिक भाषेतील चित्रपटसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतात. याबाबतीत मराठीतील ‘सैराट’चं उदाहरण जगजाहीर आहे. असाच एक प्रादेशिक चित्रपट काही दिवसांपूर्वी थिएटर्समध्ये तुफान गाजला होता. बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवणारा हा चित्रपट फक्त 50 लाख रुपयांमध्ये बनला होता. परंतु प्रादेशिक भाषेतल्या या चित्रपटाने इतर सर्व भाषांमधील प्रेक्षकांना आकर्षित केलं होतं. हा चित्रपट मूळ गुजराती भाषेत असून त्याचं नाव ‘लालो- श्री कृष्ण सदा सहायते’ असं आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.

येत्या 6 मार्च रोजी हा चित्रपट सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. अंकित सखिया दिग्दर्शिक या चित्रपटात देवभक्तीची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात 120 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. भारतीय सिनेसृष्टीतील हा पहिला सर्वाधिक कमाई करणारा गुजराती चित्रपट ठरला होता. याविषयी दिग्दर्शक म्हणाले, “या चित्रपटावर प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केला, तो आमच्या कल्पनेपलीकडचा होता. या प्रवासात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य अनेक अर्थांनी बदललं. आता ओटीटीवर हा चित्रपट स्ट्रीम होण्यासाठी सज्ज होताना माझ्या मनात श्रीकृष्णविषयी कृतज्ञतेची भावना आहे. एका छोट्या कथेच्या रुपात ज्याची सुरुवात झाली, ती आता देशातील घराघराचा एक भाग होणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

‘लालो- श्रीकृष्ण सदा सहायते’ या चित्रपटात लालो (करण जोशी) नावाच्या एका रिक्षाचालकाची कथा दाखवण्यात आली आहे, जो चोरीच्या उद्देशाने एका घरात शिरतो आणि तिथेच अडकतो. या कथेत जेव्हा देव श्रीकृष्णाची (श्रृहद गोस्वामी) एण्ट्री होते, तेव्हा अनेक आश्चर्यकारक वळणं येतात. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांना ‘ट्रॅप्ड’ आणि ‘ओह माय गॉड’ या दोन हिंदी चित्रपटांची आठवण आली. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रीवा रच्छ, श्रृहद गोस्वामी आणि करण जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. मूळ गुजराती भाषेतल्या या चित्रपटाचा हिंदी डबिंग व्हर्जन 9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला होता. हा ब्लॉकबस्टर चित्रपट दोन्ही भाषांमध्ये ओटीटीवर पाहता येणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब
  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in