• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

5 मिनिट 15 सेकंदाचं ते दर्द भरी गाणं, 72 वर्षांपासून प्रेक्षकांच्या आहे ओठांवर, ऐकून तुटलेल्या प्रेमी पण….

February 7, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Sad Song: आजच्या काळात दर्द भरी गाणे व्हायरल होणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र 1950 च्या दशकातही दु:ख, विरह आणि भावनांचे सूर लोकांच्या मनावर राज्य करत होते. त्या काळातील गाण्यांची लोकप्रियता आजच्या गाण्यांपेक्षा कमी नव्हती.

उलट ती अधिक खोलवर रुजलेली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजही त्या काळातील गाणी सोशल मीडियावर व्हायरल होतात. नव्या पिढीच्या ओठांवर रुळतात आणि रेडिओ, प्लेलिस्ट, रील्समधून पुन्हा-पुन्हा ऐकली जातात. याच अमर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मेरा दिल ये पुकारे आजा’.

हे अजरामर गीत ‘नागिन’ या चित्रपटातील आहे. या गाण्याला स्वर दिला आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. संगीतकार हेमंत कुमार यांच्या सुमधुर संगीतात आणि गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या भावस्पर्शी शब्दांत हे गाणे जणू दु:खाची हाक बनून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.

‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणे प्रदर्शित होताच सुपरहिट ठरले. चित्रपटासोबतच या गाण्याने संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवली. त्या काळात रेडिओवर हे गाणे ऐकण्यासाठी लोक तासन्‌तास बसून राहायचे. आजही प्रत्येक पिढीतील संगीतप्रेमींना हे गाणे भावते.

या गाण्याला अधिक अजरामर बनवले ते वैजयंतीमालाच्या नागिण नृत्याने. सापाच्या हालचालींवर आधारित तिचा नृत्याविष्कार आणि पार्श्वभूमीला हे दु:खी गीत या संयोजनाने प्रेक्षकांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला. आजही हे सीन आणि गाणे एकत्र पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्यांत पाणी येते.

त्या काळात सुमारे 40 लाख रुपये इतक्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘नागिन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.5 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. हा चित्रपट 1954 सालातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! भारत-पाकिस्तान हाय-प्रोफाइल सामना होणार? PCB ची ICC समोर ‘ही’ अट-सूत्र
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत रोहित पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, मनातून…
  • लाजाळू अभिनेता पण 75 महिलांसोबत प्रेमसंबंध… नोरा फतेही हिच्यासोबत तर… गर्लफ्रेंड प्रेंग्नेंट होताच उचललं मोठं पाऊल
  • India-US Trade Deal:धन्यवाद, डोनाल्ड ट्रम्प, भारत-अमेरिकेतील व्यापार करारावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, ‘मेक इन इंडिया’बाबत मोठे भाष्य
  • चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी अधिक प्रभावी काय, साबण की फेसवॉश? तज्ज्ञ काय सांगतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in