• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

45 वर्षांपूर्वाचा ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही प्रचंड ट्रेंडमध्ये, रेकॉर्ड ब्रेक कमाई, पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी, फ्रीमध्ये…

March 3, 2026 by admin Leave a Comment


1980 चं दशक हे बॉलिवूडचं ‘सुवर्णयुग’ मानलं जातं. या काळात अनेक अभिनेत्यांनी गाजलेल्या चित्रपटांमुळे स्टारडमच्या शिखरावर झेप घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचाही या दशकात प्रचंड दबदबा होता. त्यांच्या 1981 साली प्रदर्शित झालेल्या Laawaris या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आणि आजही त्यातील गाणी लोकप्रिय आहेत.

‘लावारिस’मधील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर आहे. या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी महिलांचे वेष परिधान करून केलेला नृत्याने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावलं. विशेष म्हणजे या गाण्यानंतर बिग बींनी अशा प्रकारे स्त्रियांच्या वेशात नृत्य केल्याचे उदाहरण पुन्हा दिसले नाही.

45 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर चित्रपट

1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झीनत अमान मुख्य भूमिकेत झळकली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केले होते. सुमारे 3 तास 9 मिनिटांचा हा चित्रपट त्या काळात प्रचंड हिट ठरला.

‘लावारिस’ हा 1981 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी चौथा चित्रपट ठरला होता. अवघ्या 2.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 9 कोटी रुपयांची कमाई केली. त्या काळात ही मोठी कामगिरी मानली जात होती.

गाण्यांची जादू

या चित्रपटात एकूण सहा गाणी होती आणि ती सर्वच लोकप्रिय ठरली. ‘अपनी तो जैसे तैसे’, ‘कब के बिछड़े हुए’, ‘जिसका कोई नहीं’ आणि ‘काहे पैसे पे’ ही गाणी विशेष गाजली. ‘मेरे अंगने में’च्या स्त्री आवृत्तीला अलका याज्ञिक यांचा आवाज लाभला होता.

आजही ‘लावारिस’ला आयएमडीबीवर 7.0 रेटिंग आहे आणि हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध असून अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दमदार कथा, लक्षवेधी अभिनय आणि अजरामर गाणी यामुळे ‘लावारिस’ हा 80च्या दशकातील एक क्लासिक ब्लॉकबस्टर म्हणून आजही स्मरणात आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in