• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं

April 10, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 16व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने धावांचा पाठलाग करणं पसंत केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 8 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं तसं पाहिलं तर कठीण आहे. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी करणं आवश्यक होतं. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी आक्रमक सुरूवात केली. संघाच्या 21 धावा असताना यशस्वी जयस्वालची विकेट पडली. त्यानंतर डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने मोर्चा सांभाळला. त्याने समोर जो गोलंदाज येईल त्याला धुतलं. त्याने समोर कोणता गोलंदाज आहे याचा विचारच केला नाही. 15व्या वर्षी दिग्गज गोलंदाजांना आक्रमक खेळताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आरसीबीच्या भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडला धुतलं. तसेच पावरप्लेमध्ये 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं.

आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने 353.33 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा केल्या. आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने दुसऱ्यांदा 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगाने अर्धशतक ठोकण्याचा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. त्याने कोलकात्याविरुद्ध 2023 मध्ये 13 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर पंजाब किंग्सकडून खेळताना केएल राहुलने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर युसूफ पठाणने केकेआरसाठी चेन्नईविरुद्ध 2014 मध्ये 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आयपीएल 2026 स्पर्धेत 15 चेंडूत दोन वेळा वैभवने अर्धशतक ठोकलं. पहिल्यांदा चेन्नईविरुद्ध आणि आरसीबीविरुद्ध अर्धशतक ठोकलं.

वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकात भुवनेश्वर कुमारला दोन चौकार मारले. त्यानंतर तिसऱ्या षटकात स्ट्राईक मिळाली आणि अभिनंदन सिंग समोर होता. त्याने या षटकात दोन चौकार आणि 1 षटकार मारला. वैभव सूर्यवंशीचा चौथ्या षटकात जोश हेझलवूडशी सामना झाला. या षटकात त्याने सलग तीन चौकार आणि एक षटकार मारला. पाचव्या षटकात भुवनेश्वर कुमार समोर आला. या षटकात दोन षटकार आणि दोन चौकार मारले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in