• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

400 कोटींचा खर्च, 64 टक्क्यांहून अधिक तोटा; सुपरस्टारच्या चित्रपटाने निर्मात्यांना केलं कंगाल

January 23, 2026 by admin Leave a Comment


एखादा मोठा सुपरस्टार घेऊन निर्मितीवर प्रचंड पैसा खर्च करून बनवलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेलच असं नाही. कथा हाच चित्रपटाचा गाभा असतो आणि फक्त कथेच्या जोरावर एखादा चित्रपट सुपरहिट ठरू शकतो. हेच गणित मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या बिग बजेट चित्रपटाला जुळवता आलं नाही. हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘ द राजा साब’ हा आहे. संक्रांतीच्या सुट्ट्यांचा फायदा उचलूनही ‘द राजा साब’ हा सर्वांत मोठा फ्लॉप चित्रपट ठरला आहे. प्रभासच्या स्टारडमचा फायदा उचलत या चित्रपटाने सुरुवात तर दमदार केली, परंतु पुढे ही गती टिकवता आली नाही. आता प्रदर्शनाच्या बाराव्या दिवशी या चित्रपटाला अवघे काही लाख रुपयेही कमावणं कठीण झालं आहे. तब्बल 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचा आतापर्यंत 64 टक्क्यांहून अधिक तोटा झाला आहे.

प्रभासच्या ‘द राजा साब’ या चित्रपटाने निर्मात्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची एवढी चर्चा होती की बॉक्स ऑफिसवर सर्व विक्रम मोडले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होताच संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. आधी तर चित्रपट समीक्षकांनी त्यावर नकारात्मक टिप्पणी केली आणि त्यानंतर प्रेक्षकांनाही हा चित्रपट भावला नाही. या चित्रपटाच्या कमकुवत कथेवर आणि दिग्दर्शनावर इतकी टीका झाली की पुढे अनेकांचा त्यातील रस कमी झाला. ‘द राजा साब’चं डिस्ट्रीब्युशन तगडं असूनही अनेक शोज रिकामे गेले आहेत. धक्कादायक म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटूनही, बजेटच्या 50 टक्केही वसुली करता आली नाही. तुटपुंज्या कमाईमुळे या चित्रपटाने निर्मात्यांना कंगाल केलं आहे.

‘द राजा साब’ने पहिल्या आठवड्यात 130.25 कोटी रुपये कमावले. त्यानंतर प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी फक्त 3.5 कोटी रुपये, नवव्या दिवशी 3 कोटी रुपये, अकराव्या दिवशी 2.6 कोटी रुपये, बाराव्या दिवशी 8 लाख रुपये आणि तेराव्या दिवशी 5 लाख रुपये कमाई झाली. ‘द राजा साब’ची गेल्या 14 दिवसांत एकूण कमाई जवळपास 142.71 कोटी रुपयांच्या घरात झाली आहे.

‘द राजा साब’ हा तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपट 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. परंतु 14 दिवसांत फक्त 142 कोटी रुपयांची कमाई होऊ शकली आहे. त्यामुळे एकंदरीत निर्मात्यांचा 64.48 टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे. टॉलिवूडसाठी हा अलिकडच्या काळातील सर्वांत फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तर प्रभाससाठी ‘बाहुबली’नंतरच्या काळात ‘राधेश्याम’नंतर हा दुसरा मोठा निराशाजनक चित्रपट ठरला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल
  • IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video
  • Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in