• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

360 विमानं, 3600 मिसाईल, अमेरिकन सैन्य सज्ज, इराण होणार बेचिराख; गुप्त रिपोर्टमुळे जगात खळबळ!

January 26, 2026 by admin Leave a Comment


जगात लवकरच आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. आता अमेरिका कधीही इराणवर हल्ला करू शकते. इस्रायल, जॉर्डन, सौदी अरेबिया, युएई आणि स्पेनकडून याबाबतचे संकेत मिळाले आहेत. ओमानच्या आखातात अब्राहम लिंकन है अमेरिकन लढाऊ जहाज तैणात करण्यात आले आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी 360 विमाने आणि 3600 क्षेपणास्त्रे तयार केली आहेत. आता इराणजवळ गुप्तचर विमानांच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. अमेरिकन सैन्य इराणवर हल्ले करण्याचा सराव करत आहे आणि आता कधीही इराणवर हल्ला होणार असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. याचा परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्यता आहे.

अमेरिका कधीही इराणवर हल्ला करण्याची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हिंदी महासागरापासून अनेक देशांच्या भूमीपर्यंत टप्पा निश्चित करण्यात आला आहे. अमेरिकेने यापूर्वी कधीही मध्य पूर्वेत इतके मोठे लष्कर तैनात केले नव्हते. आता इराणसोबत तणाव वाढल्याने अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इराणवर कधीही हल्ला होऊ शकतो. इस्रायली माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार, अमेरिकेची लष्करी तयारी पूर्ण झाली आहे. सैन्य इराणवर हल्ले करण्याचा आणि प्रतिहल्ले हाणून पाडण्याचा सराव करत आहे.

इराणला घेरण्याचा प्रयत्न सुरू

अमेरिकेने तीन महिने व्हेनेझुएलाची नाकेबंदी केली होती, त्यानंतर 3 जानेवारी 2026 रोजी निकोलस मादुरोविरुद्ध कारवाई केली होती. आता अमेरिका इराणविरुद्ध अशाच प्रकारच्या कारवाईची तयारी सुरू आहे. अमेरिकन नौदलाचे इराणविरुद्धचे ऑपरेशन फुल ब्लॉकेड सुरू झाले आहे. इराणी नौदलाला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केले जात आहेत. यामुळे इराणवरील दबाव वाढेल आणि ते त्यांच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिकेला अपेक्षित असा निर्णय घेतील यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.

इराणमधील सत्ता बदलण्याचाही प्रयत्न

अमेरिकेची दुसरी योजना म्हणजे इराणवर जलद आणि निर्णायक हल्ला करणे आणि खामेनीविरुद्ध मोठी कारवाई करणे ही आहे. यामुळे इराणमध्ये सत्ता बदल होईल जेणेकरून इराणचा अणुकार्यक्रम थांबवता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र हल्ला करायचा की फक्त दबाव वाढवायचा याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महिलांसाठी आनंदाची बातमी! दरमहा 3000 रुपये मिळणार, अमित शहांची मोठी घोषणा
  • IPL 2026: मला माफ करा…! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे
  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in