• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

30 हजाराची लाच घेताना पकडलं, सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली तर नुसती नोटांची बंडलं, इतक्या कोटीचं घबाड हाताला लागलं

February 25, 2026 by admin Leave a Comment


एका लायसन्स असलेल्या कोळसा वेंडरकडून 30 हजार रुपयांची लाच घेताना एका सरकारी अधिकाऱ्याला पकडलं. त्यानंतर त्याच्या घरावर धाड टाकली, तेव्हा मोठं घबाड हाती लागलं. सरकारी अधिकाऱ्यांच्या घरात कोट्यवधी रुपये सापडल्याची अशी अनेक प्रकरणं आहेत. कटक सर्कल माइन्सचे डेप्युटी डायरेक्टर देबब्रत मोहंती यांना एका दिवसापूर्वी ट्रॅप ऑपरेशनमध्ये पकडलं होतं. त्यात ते लायसन्स असलेल्या कोळसा वेंडरकडून 30 हजार रुपयांची लाच घेत होते. त्यानंतर ओदिशाच्या भुवनेश्वरमधील अँटी करप्शन एजन्सीने बुधवारी देबब्रत मोहंती यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. तिथून 4 कोटी रुपये जप्त केले. ओदिशा विजिलन्सच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कॅश जप्तीची कारवाई आहे.

देबब्रत मोहंती यांच्या अटकेनंतर विजिलेंस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. यात पाटियाच्या श्री विहार येथे नेचर्स क्रेस्ट अपार्टमेंटमध्ये त्यांचा रेजिडेंशियल फ्लॅट आहे. भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथे वडिलोपार्जित घर आणि कटकमधल्या त्यांच्या ऑफिस चेम्बर येथे छापेमारीची कारवाई करण्यात आली.

पैशांची मोजणी सुरु आहे

छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांच्या भुवनेश्वरच्या फ्लॅटमधील ट्रॉली बॅग आणि कपाटात मोठ्या प्रमाणात असलेली रोख रक्कम, कॅश जप्त केली. एकूण किती रक्कम जप्त केली ते समजावं, यासाठी जप्त केलेल्या पैशांची मोजणी सुरु आहे. त्याशिवाय आरोपीच्या ऑफिसचं शेल्फ आणि त्याच्या खासगी सामानातून 1.20 लाख रुपये जप्त केले.

Following apprehension of Sri Debabrata Mohanty, I/C Deputy Director, Mines, Cuttack Circle, by #Odisha #Vigilance yesterday night for taking bribe Rs.30,000/- from a coal vendor, over Rs 4 Crore cash recovered from his flat in #Bhubaneswar & seized. Counting on.
Searches ctng. pic.twitter.com/xE92sYuuen

— Odisha Vigilance (@OdishaVigilance) February 25, 2026

सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे

विजिलेंस टीमला दुसऱ्या संपत्तीची सुद्धा माहिती मिळाली आहे. यात भुवनेश्वरच्या पहला येथे 2400 चौरस फुटाची एक दोन मजली इमारत आणि जवळपास 130 ग्रॅम सोनं याचा समावेश आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे. तपास पुढे केल्यानंतर अजून माहिती दिली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्याकडे अजून ब्लॅक मनी आणि बेकायद सामना मिळू शकतं असा अंदाज आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in