• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

3 प्रकारचे मुसलमान असतात… एक बूट मारणारा, तर दुसरा… एमआयएमच्या मुस्लिम नेत्याचं वादग्रस्त विधान

February 10, 2026 by admin Leave a Comment


मुसलमान तीन प्रकारचे असतात एक बूट चाटणारा मुसलमान असतो… दुसरा बुटांनी मार खाणारा मुसलमान आणि तिसरा बुटांनी मारणारा मुसलमान… असं वक्तव्य खुद्द एका मुस्लीम नेत्याने केलं. एवढंच नाही तर, प्रकारच्या मुसलमान बांधवांचं वर्णन करत नेत्याने राजकीय पक्षांना देखील त्यासोबत जोडलं. सध्या नेत्याच्या वक्तव्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वादग्रस्त वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर, AIMIM नेता तौकीर निझामी यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त AIMIM नेता तौकीर निझामी यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
तीन प्रकारचे मुसलमान…

अन्य मुस्लीम बांधवांना संबोधित करत निझामी म्हणाले… एक बूट चाटणारा मुसलमान म्हणजे काँग्रेस पक्ष… बुटांनी मार खाणारा मुसलमान म्हणजे भाजप पक्ष आणि तिसरा मुसलमान म्हणजे बुटांनी मारणारा मुसलमान म्हणजे मजलिस (AIMIM)… तौकीर म्हणाले की, ओवैसी बंधूंनीच 15 मिनिटांत पोलिसांना हटवण्याचं विधान केलं होतं.

काँग्रेस पक्षावर साधला निशाणा…

काँग्रेस पक्षावर निशाणा साधत निझामी म्हणाले, ‘काँग्रेसने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत पाहिलं आहे, मुसलमानांकडून फक्त गुलामी करुन घेतली आहे. ते झेंडे लावतात आणि गालिचे पसरवतात. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधत निझामी म्हणाले, कमलनाथ 100 टक्के मते मागतात पण प्रतिनिधित्वाच्या नावाखाली फक्त दोन जागा देतात…’

गुलामीतून बाहेर पडण्यासाठी एकमात्र मार्ग म्हणजे मजलिस…

निझामी म्हणाले, ‘मजलिस म्हणजे AIMIM हा एकच मार्ग आहे. ज्यामुळे मुसलमान गुलामीतून बाहेर येईल… दोन दुकानं आहेत… एक द्वेषाचं दुकान आणि प्रेमाचं दुकान, पण मुस्लिमांना त्यांचे हक्क फक्त असदुद्दीन ओवैसीच्या पक्षातच मिळतील…’ पुढे स्वतःच्या विधानावर स्पष्टीकरण देत निझामी म्हणाले, ‘देशात हिंसेला दुजोरा देत नाही तर, मुसलमान बांधवांना गुलामीतून मुक्त करण्याचा एक प्रयत्न आहे…’

‘मुसलमान बांधवांनी आता जागं झालं पाहिजं… बूट चाटणारे आणि बुटांनी मार देणारे मुसलमान होऊ नका… मुसलमान बांधवांनी आता रस्त्यावर आलं पाहिजे… ‘ बिहारचं उदाहरण देत निझामी म्हणाले, तेथे एआयएमआयएमच्या तिकिटांवर पाच आमदार निवडून आले. महाराष्ट्रात एआयएमआयएमने 125 नगरसेवक निवडून दिले आहेत.

काय म्हणाले भाजपचे विश्वास सारंग?

मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग यावर म्हणाले, ‘कोण बुटांनी मारेल त्याने मारुन दाखवलं पाहिजे… मध्य प्रदेश शांतीचं क्रेंद्रबिंदू आहे. त्यामुळे असं वादग्रस्त वक्तव्य सहन केलं जाणार नाही.. ओवैसी असोत, त्यांचे भाऊ असोत किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असोत, ते हिंसाचार भडकवण्याबद्दल बोलतात. ते लोकांना भडकवतात आणि त्यांना राजकारणात उतरवतात. अशी विधानं आक्षेपार्ह आहेत. राजकारणात अशा बोलण्याला स्थान नाही. ‘



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत
  • घाणेरडी टाकी साफ करण्याची भन्नाट ट्रिक, आत न जाता होईल स्वच्छ, वापरा ही सोपी पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in