भारतातील कोर्टाकडून दयामरणाची मंजूरी मिळालेली पहिली व्यक्ती ठरलेल्या हरीश राणा यांनी मंगळवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ( AIIMS ) मध्ये शेवटचा श्वास घेतला. भारतात निष्क्रीय इच्छामृत्यू ( पॅसिव्ह युथेनेशिया ) ची मंजूरी मिळणारी ते पहिली व्यक्ती होते. साल २०१३ पासून ते कोमात होते आणि गेल्या १३ वर्षांपासून लाईफ सपोर्ट सिस्टीमच्या आधारे त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]
Archives for March 2026
IPL 2026 स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचा मालक बदलला, 15 हजार कोटींची बोली कोणी लावली?
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहे. काही फ्रेंचायझी खेळाडूंच्या गैरहजेरीमुळे संकटात आल्या आहेत. तर काही फ्रेंचायझी पर्यायी खेळाडू शोधण्यासाठी धडपड करत आहेत. असं असताना आयपीएल स्पर्धेत पहिलं जेतेपद मिळवणारा चॅम्पियन राजस्थान रॉयल्स संघाला नवा मालक मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजस्थान रॉयल्स संघाचा मालक बदलला जाणार अशी चर्चा होती. अखेर 1.65 […]
Ashok Kharat | 5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती, आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिक तीव्र झाला असून, खरातच्या अडचणी वाढल्या आहेत. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी धक्कादायक दावा करत, अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला. तसेच, तपासादरम्यान एसआयटीच्या हाती काही पेनड्राईव्ह आणि महत्त्वाचा डिजिटल डेटा लागला असून, त्यामुळे […]
dhurandhar 2 : धुरंधर 2 पाहिल्यानंतर कथा, प्रोपेगेंडा या पलीकडे जाऊन ‘रॉ’ बद्दल निर्माण झालेले काही प्रश्न
दोन दिवसांपूर्वीच ‘धुरंधर द रिवेंज’ सिनेमा पाहिला. डिसेंबर महिन्यात ‘धुरंधर’ चा पाहिला भाग पाहिल्यानंतर पार्ट 2 बद्दल प्रचंड उत्सुक्ता होती. ‘धुरंधर 2’ सिनेमा तुम्हाला कुठेच निराश करत नाही. जसकीरतच्या अगदी पहिल्या सीनपासून हा चित्रपट तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो, तो शेवटपर्यंत. हे दिग्दर्शकाचं कौशल्य, यश म्हणावं लागेल. पहिल्या भागात गँगस्टर रेहमान डकैतचा मृत्यू झाल्यानंतर ल्यारीचा पुढचा […]
निसर्गाचा चमत्कार! भारतातील या ठिकाणी उड्या मारल्या की हलते जमीन, पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी
छत्तीसगडमधील मैनपाट हे मिनी शिमला म्हणून ओळखले जाणारे सुंदर हिल स्टेशन आपल्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3300 फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण थंड हवामान आणि हिरवाईसाठी प्रसिद्ध आहे. येथील सर्वात रहस्यमय ठिकाण म्हणजे जलजली. येथे जमिनीवर चालताना किंवा उडी मारताना जमीन स्पंजसारखी हलताना जाणवते. जे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरले आहे. या घटनेमागचे […]
‘या’ सोप्या टिप्स डोळ्यांचा थकवा कमी करण्यास करतील मदत
आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांच्या समस्या सतावत आहेत. यामागील कारण म्हणजे स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे. याशिवाय चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळेही डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. रोजच्या जीवनातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे डोळ्यांचा थकवा जाणवणे. पापण्या न मिटवता एकाच वस्तूवर लक्ष केंद्रित केल्याने डोळ्यांवर आणि आजूबाजूच्या स्नायूंवर ताण वाढतो. यामध्ये ऑफिस काम करणारे स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे, सतत […]