1987-88 च्या सुमारास बोफोर्स घोटाळा प्रकरणामुळे अमिताभ बच्चन यांची प्रतिमा कमी झाली होती. अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून अंतर ठेवले होते आणि त्यांच्या काही चित्रपटांचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले होते. अशा कठीण काळात निर्माता केसी बोकाड़िया यांनी अमिताभ यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना चित्रपटाची ऑफर दिली. अमिताभ यांचे भाऊ आणि मॅनेजर अजिताभ बच्चन यांनी मोठ्या मानधनाची मागणी […]
Archives for March 2026
राहुल गांधींच्या ‘त्या’ आरोपावर ज्योतिरादित्य सिंधिया जोरदार टीका, थेट उत्तर देत उपस्थित केले सवाल
Satta Sammelan 2026: टीव्ही9 नेटवर्कच्या सत्ता संमेलनात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. संसदेत बोलू दिले जात नाही, या राहुल गांधी यांच्या आरोपाला त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. या संमेलनात बोलताना सिंधिया यांनी संसदेत निर्माण होणाऱ्या गोंधळासाठी विरोधकांनाच जबाबदार धरले. त्यांनी सांगितले की, लोकशाहीत […]
रामनवमीला शोभन योगाचा दुर्मिळ संयोग, ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस
अयोध्येतील भव्य राम मंदिरापासून ते देशाच्या कानाकोपऱ्यात, भगवान श्रीरामांच्या जयंतीनिमित्त जोरदार तयारी सुरू झाली आहे. हिंदू धर्मात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवव्या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 2026 मधील रामनवमी विशेषतः खास असणार आहे. कारण या दिवशी शोभन योगाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग तयार […]
Kolhapur Petrol Shortage Issue | कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर गेल्या दोन दिवसांपासून वाहनधारकांची मोठी रांग दिसत होती. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर निर्बंध लादले आहेत. टु-व्हीलरसाठी दररोज 200 रुपये एवढा पेट्रोल तर फोर-व्हीलरसाठी 2000 रुपये एवढा पेट्रोलचाच पुरवठा प्रत्येक ग्राहकाला करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, आता पेट्रोल […]
NZ vs SA : फायनलआधी न्यूझीलंडला झटका, कॅप्टन पाचव्या सामन्यातून आऊट, कुणाला संधी?
न्यूझीलंड मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना हा निर्णायक ठरणार आहे. हा सामना बुधवारी 25 मार्च रोजी होणार आहे. मात्र त्याआधी न्यूझीलंडला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज टॉम लॅथम याला दुखापतीमुळे पाचव्या सामन्यालाही मुकावं लागलं […]
‘धुरंधर 2’मध्ये आदित्य धर यांची सर्वात मोठी चूक, कोणाच्याच लक्षात आली नाही, पण प्रेक्षकांनी दाखवली
दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक देखील केलं आहे. मात्र, या सर्व चर्चेदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यातून चित्रपटातील मोठी चूक समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता रणवीर सिंहचा फाइट सीन दाखवण्यात आला आहे. […]