टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर भारताला 21.5 कोटींचं बक्षीस मिळालं. यासह या स्पर्धेतील 9 पैकी 8 सामन्यात भारताने विजय मिळवला. प्रत्येक विजयासाठी भारताला जवळपास 28.64 लाख मिळाले. म्हणजेच 8 विजयांसाठी 2 कोटी 29 लाख आणखी मिळाले. तर न्यूझीलंड उपविजेता संघ ठरला. या संघाला 10.75 कोटी बक्षीस मिळालं. न्यूजीलंडने या स्पर्धेत एकूण […]
Archives for March 2026
भारतीय टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार बदलणार! कोण करणार नेतृत्व? जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर रोहित शर्माने या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे नेतृत्व बदल होणार हे निश्चित झालं होतं. भारतीय संघ त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला तेव्हा शुबमन गिलने नेतृत्व केलं. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या हाती सूत्र सोपवली गेली. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत त्याने ही धुरा व्यवस्थितरित्या सांभाळली आणि संघाला जेतेपद मिळवून दिलं. आता […]
हिरे व्यापारी नाही मग आता मलायका कोणाच्या मिठीत? नव्या मिस्ट्री मॅनसोबत व्हिडीओ तुफान व्हायरल
Malaika Arora With Mystery Man: अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका हिरे व्यापारी हर्ष मेहता याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला. दोघांचे रोम येथील फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले. आता पुन्हा मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर मलायका […]
America, Iran War : युद्धात मोठा उलटफेर, इराणचा अमेरिकेला जबरदस्त हादरा, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये इराणनचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबतच त्यांची मुलगी, नात जावई आणि इतरही काही बड्या सैन्य अधिकाऱ्यांचा या घटनेत मृत्यू झाला होता. […]
Chanakya Niti : असे लोक मृत्यूनंतरही जिवंत राहतात, चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय?
आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजामध्ये तुम्हाला विविध स्वभावाचे लोक भेटतात. काही लोक हे स्वार्थी असतात, तर काही लोक हे धूर्त मनाने कपटी असतात. तर काही लोक हे मनाने खूप चांगले असतात. गरज असेल तर असे लोक […]
ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांना मोठा दणका, सरकारकडून तात्पुरता परवाना रद्द
मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच संबंधित कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री यांनी विधानपरिषदेत केली आहे. त्यामुळे आता या कंपन्यांच्या सेवेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून […]