• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, थिएटरमध्ये कंटाळले लोक, निर्मात्यांचं झालं मोठं नुकसान, OTT वर येताच ठरला ब्लॉकबस्टर

February 9, 2026 by admin Leave a Comment


Flop Film : सिनेसृष्टीत अनेकदा असा अनुभव येतो की, बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला चित्रपट ओटीटीवर मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. असाच काहीसा प्रकार ‘परशक्ती’ या तमिळ चित्रपटाबाबत घडताना दिसतो आहे. 2 तास 39 मिनिटांचा हा तमिळ पॉलिटिकल अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 10 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र रिलीज होताच या चित्रपटाने निर्मात्यांना मोठा आर्थिक धक्का दिला आणि वर्षाच्या सुरुवातीलाच कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागलं.

‘परशक्ती’ या चित्रपटाची कथा गुणसेकरन, कन्नन आणि थंगावेलु या तीन भावांभोवती फिरते. हा चित्रपट प्रेक्षकांना एका जुन्या ऐतिहासिक काळात घेऊन जातो.
कथेप्रमाणे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परिस्थिती अशी बदलते की तीनही भाऊ वेगवेगळ्या दिशांना विखुरले जातात. युद्ध संपल्यानंतर मोठा भाऊ गुणसेकरन मायदेशी परततो आणि देशात पसरलेली गरीबी, अंधश्रद्धा, धार्मिक पाखंड आणि सामाजिक अन्याय यांचा सामना करतो.

चित्रपट पुढे जात असताना समाजातील अंधविश्वास, धार्मिक शोषण, जातीय भेदभाव आणि महिलांवर होणारे अत्याचार यावर कठोर भाष्य करताना दिसतो. कथानक गंभीर सामाजिक प्रश्नांवर आधारित असलं तरी त्याची मांडणी अनेक प्रेक्षकांना प्रभावी वाटली नाही.

प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटलेला कंटेंट

थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाला कंटाळवाणा आणि प्रभावहीन अशी प्रतिक्रिया दिली. याच कारणामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकू शकला नाही. चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केलं होतं. प्रमुख भूमिकांमध्ये शिवाकार्तिकेय, रवि मोहन आणि श्रीलीला झळकले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘परशक्ती’ चित्रपटाचे एकूण बजेट 150 ते 200 कोटी रुपये इतके होते. मात्र थिएटरमधील कमाई केवळ 84 ते 85 कोटी रुपयांपर्यंतच मर्यादित राहिली. यामुळे निर्मात्यांना जवळपास 95 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. बॉक्स ऑफिसवरील हा अपयशाचा धक्का आजही निर्मात्यांना सावरता आलेला नाही असं बोललं जात आहे.

ओटीटीवर मात्र बदलले चित्रपटाने नशिब

थिएटरमध्ये अपयशी ठरल्यानंतर 7 फेब्रुवारी 2026 रोजी हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, रिलीज झाल्यानंतर अवघ्या 48 तासांतच ‘परशक्ती’ ओटीटीवर नंबर 1 ट्रेंडिंग चित्रपट ठरला. या चित्रपटाने ZEE5 वरील टॉप 10 ट्रेंडिंग हिट चित्रपटांनाही मागे टाकलं असून सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक कारवर 100% रोड टॅक्स माफ, ‘या’ सरकारच्या नव्या पॉलिसीत काय आहे खास?
  • Nashik Crime : मीटिंगमध्ये पायाने स्पर्श, लॉबीत शरीराशी झटापट आणि.. नाशिकच्या कंपनीत घडणारं वाचून लाजेनं जाईल मान खाली !
  • आशा भोसले यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची पोस्ट; ‘त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं ऐकून..’
  • Maratha Reservation: मनोज जरांगेंना झटका, या गुन्ह्यांना माफी नाहीच! मराठा आंदोलकांवरील 828 गुन्हे मागे, सरसकट माफी नाहीच
  • भाजप नगरसेविकेच्या पतीला भयानक मारहाण, घटनेचा Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in