• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2025 चा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट, 1300 कोटींच्या कमाईनंतर OTT वर करतोय राज्य, पहिल्याच दिवशी बनला नंबर 1

February 2, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Movies 2025 : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. ज्यामध्ये ‘स्त्री 2’, ‘पुष्पा 2’ अशा चित्रपटांनी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर कब्जा केला. असाच एक चित्रपट जो 2025 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याची स्टोरी आणि त्यामधील गाणी प्रेक्षकांना इतकी आवडली की तो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने मोठ-मोठ्या चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्ड मोडले. अशातच आता या चित्रपटाने आणखी एक मोठा इतिहास रचला आहे.

बॉक्स ऑफिसवर तब्बल 1300 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’ने आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. चित्रपटगृहांमध्ये अनेक आठवडे वर्चस्व गाजवल्यानंतर ‘धुरंधर’ जसा ओटीटीवर प्रदर्शित झाला तसाच तो प्रेक्षकांचा फेव्हरेट ठरला. रिलीज होताच हा चित्रपट ओटीटीवरील टॉप 10 लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

धुरंधर चित्रपटाची कथा

रणवीर सिंगचा हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि रणवीर सिंगच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धर यांनी लिहिली असून दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनीच सांभाळली आहे.

‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंग भारतीय अंडरकव्हर एजंट हमजाच्या भूमिकेत झळकला आहे. देशासाठी जीव धोक्यात घालून पाकिस्तानच्या कुख्यात गँगमध्ये घुसखोरी करणाऱ्या एजंटची भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. रणवीरचा लूक, बॉडी लँग्वेज, तसेच त्यांची आक्रमक आणि इंटेन्स डायलॉग डिलिव्हरी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवते. अनेक समीक्षकांच्या मते हा रणवीर सिंगच्या करिअरमधील सर्वोत्तम परफॉर्मन्सपैकी एक आहे.

अक्षय खन्नाच्या एन्ट्रीवर चाहते फिदा

चित्रपटातील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे अक्षय खन्ना. त्याने पाकिस्तानी गँगस्टर रहमान डकैतची भूमिका साकारली असून त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मने जिंकली आहेत. विशेषतः ‘Fa9la’ या गाण्यात अक्षय खन्नाची एंट्री होताच थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला होता.

ज्यांनी काही कारणास्तव ‘धुरंधर’ थिएटरमध्ये पाहिला नाही त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. हा चित्रपट आता घरबसल्या नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 8.4 रेटिंग मिळाली आहे जी त्याच्या दर्जाची साक्ष देते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budget 2026 : एआयच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय, टेक क्षेत्रातून निर्णयाचे स्वागत
  • 1 तास 34 मिनिटांचा हा चित्रपट अक्षरश: उडवेल झोप; IMDb वर दमदार रेटिंग
  • Budget 2026: साल 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही ? बजेटमध्ये काय मिळाले संकेत…
  • Alcohol Rules: तुम्ही घरात किती दारू ठेवू शकता? नियम काय सांगतो?
  • 4 आठवड्यांत मराठी चित्रपटाची बजेटच्या चौपट कमाई; आता सवलतीच्या तिकिटांसाठी पुढाकार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in