• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2009 च्या या चित्रपटापुढे बाहुबली, पुष्पा आणि RRR चित्रपट फेल, कमाई पाहून हादरले होते बॉलिवूड कलाकार

April 7, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांची कमाई आणि कथा पाहून प्रेक्षक देखील थक्क झाले होते. यामध्ये अनेक चित्रपट आहेत. जसे की दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे नाव आज जागतिक स्तरावर ओळखले जाते. भव्य सेट्स, दमदार कथा आणि अफलातून व्हिज्युअल्स यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजामौली यांनी बाहुबली आणि RRR सारख्या चित्रपटांद्वारे भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर पोहोचवले. मात्र, ‘बाहुबली’पूर्वीच त्यांनी एक असा चित्रपट दिला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘मगधीरा’मध्ये राम चरण आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने केवळ साऊथ इंडस्ट्रीतच नाही तर जागतिक स्तरावरही प्रचंड लोकप्रियता मिळवली. हा चित्रपट साऊथ इंडस्ट्रीमधील पहिला असा चित्रपट ठरला, ज्याने 150 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. त्या काळात ही कमाई अभूतपूर्व मानली जात होती.

पुनर्जन्मावर आधारित दमदार कथा

‘मगधीरा’ची कथा एका ऐतिहासिक युद्धावर आधारित आहे. यात नायकाचा 400 वर्षांनंतर पुनर्जन्म होतो आणि त्याला त्याच्या मागील जन्मातील आठवणी पुन्हा जाग्या होतात. राज्य, प्रेम आणि सूड यांच्या संगमातून तयार झालेली ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरली.

चित्रपटातील युद्धाचे सीन आणि ग्राफिक्स त्या काळासाठी अत्यंत प्रगत मानले गेले. भव्य सेट्स आणि अॅक्शन सिक्वेन्सेसमुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. प्रेमकहाणी आणि अॅक्शन यांचा उत्तम मिलाफ हा या चित्रपटाचा खास ठरला.

परदेशातही गाजला ‘मगधीरा’

या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर परदेशातही छाप सोडली. विशेषतः जपानमध्ये ‘मगधीरा’ला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तेथेही चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली.

‘मगधीरा’च्या यशानंतरही साऊथ सिनेमाला जागतिक स्तरावर ओळख मिळण्यासाठी अजून काही वर्षे जावी लागली. त्यानंतर जवळपास 10 वर्षांनी ‘बाहुबली’सारखा भव्य चित्रपट आला आणि इतिहास घडवला. मात्र, ‘मगधीरा’नेच त्या यशाची पायाभरणी केली होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

या चित्रपटामुळे राम चरण आणि काजल अग्रवाल यांना मोठी लोकप्रियता मिळाली. ‘मगधीरा’ने त्यांना साऊथ सिनेमातील सुपरस्टारच्या यादीत स्थान मिळवून दिलं. ‘मगधीरा’ हा केवळ एक चित्रपट नाही तर साऊथ इंडियन सिनेमाच्या भव्यतेची झलक देणारा एक टप्पा होता. ज्याने पुढे ‘बाहुबली’सारख्या चित्रपटांसाठी मार्ग मोकळा केला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG सिलेंडरवर किती टॅक्स भरावा लागतो? तो हटवल्यास 913 रुपयांचा सिलेंडर किती रुपयांनी होईल स्वस्त?
  • उन्हाळी सुट्टीत हैदराबाद फिरायला जाताय तर ‘या’ 5 सर्वोत्तम स्थळांना द्या भेट
  • रियलमीचा हा फोन 7000mAh बॅटरीसह ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच
  • IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान, 11.75 कोटींची गुंतवणूक पाच सामन्यात वाया
  • KKR vs PBKS सामना पावसामुळे रद्द, पण कोलकात्याची मोठी चूक उघड! अजिंक्य रहाणेने काय केलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in