• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 वेळा जेवण, 10 तास झोप..; 50 वर्षीय अक्षय खन्नाने सांगितलं फिटनेसचं रहस्य

January 8, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अभिनेता अक्षय खन्ना प्रकाशझोतात आहे. या चित्रपटा त्याने क्रूर रेहमान डकैतची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. दमदार अभिनयासोबतच 50 वर्षीय अक्षयचं फिटनेस पाहून चाहते भारावून गेले आहेत. त्याचं फिटनेस रुटीन आणि डाएट प्लॅनविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने त्याचं रुटीन, खाण्यापिण्याच्या सवयी यांविषयी सांगितलं आहे. विशेष म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही तो त्याचं हेच रुटीन फॉलो करतो. त्याच्या डाएटमध्ये विशेष असा कोणताच बदल केला जात नाही. त्याचसोबत कोणता गोड पदार्थ आणि कोणती भाजी आवडते, याविषयीही त्याने सांगितलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “आजसुद्धा मी कधीच नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट करत नाही. मी थेट दुपारी पोटभर जेवण करतो आणि रात्री डिनर. लंच आणि डिनरदरम्यान मी काहीच खात नाही. सँडविच किंवा बिस्किट यांसारखे स्नॅक्ससुद्धा मी खात नाही. मी माझ्या डाएटबद्दल खूप सजग असतो. परंतु संध्याकाळचा चहा मी कधीच सोडत नाही. संध्याकाळी मी फक्त एक कप चहा पितो आणि तेवढंच मला पुरेसं असतं.”

“मी फारसं फॅन्सी असं काही खात नाही. माझं जेवण एकदम साधं आणि बॅलेन्स्ड असतं. दुपारच्या जेवणात मी डाळ-भात खातो. त्यासोबत एखादी भाजी किंवा चिकन किंवा फिश किंवा एखादी नॉन-व्हेज डिश आवर्जून असतं. रात्रीच्या जेवणात मी कोणत्याही भाजीसोबत चपाती खातो आणि एक चिकनच्या डिशचा समावेश असतो. बहुतेकवेळा माझं जेवण असंच असतं. शूटिंगच्या वेळीही माझं डाएट एकसारखंच असतं. त्यात काही बदल नसतो. पण मी 10 तास झोप पूर्ण करतो”, असं त्याने पुढे सांगितलं आहे.

अक्षय खन्नाचा आवडता पदार्थ कोणता?

या मुलाखतीत अक्षयने त्याच्या आवडीचं जेवण कोणतं, हेसुद्धा सांगितलं. अक्षयला गोड पदार्थही फार आवडतात. त्यातही केक त्याला सर्वाधिक आवडतं. याशिवाय फळांमध्ये लिची, भाज्यांमध्ये भेंडीची भाजी त्याला आवडते. अक्षयने पुढे म्हटलं की त्याला गोड पदार्थ इतके आवडतात की तो काहीही गोड खाऊ शकतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budget 2026 : आता सिगारेट महागली, जाणून घ्या 10 रुपयांची सिगारेट किती रुपयांना मिळणार?
  • Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून…
  • आता हे सहन करू शकत नाही, युवी तर…, युवराज सिंहच्या बायकोच्या विधानामुळे खळबळ
  • Budget 2026: आपण 2047 पर्यंत होणार ग्लोबल लीडर..’, सीतारमण यांच्या बजेट भाषणातील 10 मोठ्या घोषणा काय?
  • Horoscope February : 3 राशींच्या आयुष्यात नवं संकट, कोणाला मिळणार मोठी संधी? वाचा काय-काय घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in