• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी महाराष्ट्रावर मोठं संकट, 12 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, प्रशासनाकडून…

March 13, 2026 by admin Leave a Comment


मार्च महिना सुरू असून अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानचअत्यंत मोठा इशारा दिला. 17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी मोठे संकट आहे. यादरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. यादरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील आहे. अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

रब्बीच्या पिकाला काही दिवसांपूर्वीच पावसाने झोडपले, त्यानंतर आता कृषी विभागाकडून हा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. काल अमरावती ठरले देशातील सर्वात उष्ण शहर. अरावतीमध्ये 42.2 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील तापमानाच्या तुलनेत कालचे हे तापमान जास्त असल्याची माहिती.

विदर्भात सध्या उष्णतेची लाट मात्र उद्यापासून अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे. ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे. मात्र उद्यापासून विदर्भात तापमानात बदल होऊन अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात तापमानाचा पार 39 अंशाच्या पुढे गेला असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने फुलांमध्ये देखील वाढ झाली आहे. फुलांच्या हार पाच रुपये प्रमाणे वाढ झाली आहे. धुळे शहरात मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होते मात्र सध्या फुलांची आवक घटल असून तापमान वाढला आहे. तर दुसरीकडे लग्नसराई देखील सुरू झाल्याने मुलांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्यात अल्प प्रमाणात फुल शेती केली जाते त्यामुळे नगर जिल्ह्यातून सध्या धुळे जिल्ह्यामध्ये विविध जातींची फुल आणली जात आहे मात्र त्यांची किंमत वाढली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in