• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1500 रुपयात गॅस सिलिंडरची विक्री?, इराण युद्धाने ग्राहकांमध्ये घबराट, अनेक शहरात बुकींगसाठी रांगा

March 9, 2026 by admin Leave a Comment


इराण युद्ध सुरु असताना भारतात एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक शहरात आणि गावात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. लोक रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीच्या बाहेर उभे आहेत. लवकरात लवकर गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारने आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशातील एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. मात्र, ही स्थिती मुख्यत्वे घाबरल्यामुळे होत असलेल्या बुकींग आणि काही स्थानिक पातळीवर बुकींगच्या समस्यांमुळे येत आहे.

सोमवारी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात देखील असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. नोएडा सेक्टर २२ मधील भारत गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांच्या रांगा लागण्याची चित्र होते. अनेक लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे होते आणि गॅस सिलिंडर मिळण्याची वाट पाहात होते. याच धर्तीवर उत्तर प्रदेशातही सीतापूर जिल्ह्यातील बर्डपूर गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीच्या बाहेर बसलेले दिसत होते.असे म्हटले जात आहे की हा व्हिडीओ सात मार्च रोजीचा आहे. त्यादिवशी मोठ्या संख्येने लोक गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे होते.

इराण युद्ध आणि एलपीजी संदर्भात घबराट –

अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे की एलपीजीची वास्तविक कमतरता नाही. अनेक लोकांनी सांगितले त्यांना सहज गॅस सिलिंडर मिळत आहेत. एजन्सीला सिलिंडरचा पुरवठा देखील होत आहे. उत्तर प्रदेशातील एका महिलेने दावा केला की तिला १५०० रुपये देऊन काळ्या बाजारात सिलिंडर खरेदी करावा लागला आहे. महिलेने सांगितले की रमजानचा महिला चालू असून गॅसची गरज जास्त असल्याने मजबूरीमुळे तिला काळ्या बाजारातून सिलिंडर घ्यावा लागत आहे.

होर्मुज सामुद्रधुनी बंद

दिल्लीच्या दक्षिण भागात काम करणाऱ्या इंडेन गॅस एजन्सीच्या डिलीव्हरी पार्टनरने सांगितले की चार ते पाच दिवसांपासून गॅस सिलिंडरची बुकींग अचानक वाढली आहे. लोकांमध्ये घबराट पसरल्याने बुकींगमध्ये अचानक वाढ झाली आहे. परंतू पुरवठ्यामध्ये काही खास कमतरता नाही. इराण आणि अमेरिका – इस्राईलचे युद्ध सुरु असल्याने इंधनाचा तुटवडा होणार असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.  युद्धाचा हा दहावा दिवस आहे. याच वेळी इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या देशाचा आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक, २०० हून अधिक जण ठार झाल्याचा संशय
  • आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ
  • GK : भारतात एका मिनिटाला किती बालके जन्मतात? हैराण करणारा आकडा
  • शत्रू तुमच्या पायाशी घेईल लोळण, चाणक्य नीतीचे 3 गुप्त नियम एकदा वाचा, मग कधीच होणार नाही पराभव!
  • IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in