• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

131 मिनिटांचा क्राइम थ्रिलर, ‘दृश्यम’पेक्षा 100 पटींनी अधिक सस्पेन्स; ओटीटीवर 1 नंबरवर होतोय ट्रेंड

April 9, 2026 by admin Leave a Comment

भारतीय सिनेसृष्टीत जेव्हा कधी मर्डर मिस्ट्रीबद्दल बोललं जातं तेव्हा अजय देवगणच्या 'दृश्यम' या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून केला जातो. परंतु आता ओटीटीवर एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे ज्याने सस्पेन्सचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने हे सिद्ध केलं आहे की कोणताही गाजावाजा न करता मोठ्या बजेटशिवाय एखादा मास्टरपीस बनवला जाऊ शकतो.

भारतीय सिनेसृष्टीत जेव्हा कधी मर्डर मिस्ट्रीबद्दल बोललं जातं, तेव्हा अजय देवगणच्या 'दृश्यम' या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून केला जातो. परंतु आता ओटीटीवर एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्याने सस्पेन्सचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने हे सिद्ध केलं आहे की कोणताही गाजावाजा न करता, मोठ्या बजेटशिवाय एखादा मास्टरपीस बनवला जाऊ शकतो.

या क्राइम थ्रिलरचं नाव आहे 'वध 2'. हा चित्रपट फक्त प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवत नाही तर विचार करायला भाग पाडतो. एका सर्वसामान्य माणसाला हत्येचा आरोपी बनवताना पाहून डोकं चक्रावून जातं. हा चित्रपट तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवून ठेवतो.

यामध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता अशा दोन दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कथा एका तुरुंगाभोवती फिरते. शंभूनाथ मिश्रा (संजय मिश्रा) हे मध्य प्रदेशातील शिवपुरी जेलमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून काम करत असतात. त्यांच्या पत्नीचं निधन झालं असून मुलगा परदेशात शिकायला जातो. मुलाच्या शिक्षणासाठी शंभूनाथने मोठं कर्ज घेतलेलं असतं आणि आता तुटपुंज्या पगारातून ते कर्ज फेडणं त्यांना अशक्य होत आहे.

अशातच शंभूनाथ तुरुंगातच भाजीपाला पिकवतो आणि नंतर बाहेर जाऊन ते विकतो. थोडीवर अधिकची कमाई करण्यासाठी तो ही मेहनत घेत असतो. त्याचवेळी तुरुंगात मंजू सिंह (नीना गुप्ता) ही दोन हत्यांच्या आरोपाखाली तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असते. या सर्वांदरम्यान आमदाराचा भाऊ केशव जेलमध्ये येतो तेव्हा कथेत मोठा ट्विस्ट येतो. केशव तुरुंगात कोणालाच घाबरत नाही आणि इतर कैद्यांना मारहाण करत असतो.

एकेदिवशी केशव त्याच्या बॅरेकमध्ये दिसत नाही तेव्हाच 'वध 2'च्या कथेच जबरदस्त ट्विस्ट पहायला मिळतो. केशवला शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात परंतु त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नाही. सुरुवातीला अत्यंत साधा वाटणारा हा चित्रपट पुढे इतका सस्पेन्स थ्रिलर बनतो की तुम्ही त्यात पूर्णपणे गुंतून जाता.

एकेदिवशी केशव त्याच्या बॅरेकमध्ये दिसत नाही, तेव्हाच 'वध 2'च्या कथेच जबरदस्त ट्विस्ट पहायला मिळतो. केशवला शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात, परंतु त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नाही. सुरुवातीला अत्यंत साधा वाटणारा हा चित्रपट पुढे इतका सस्पेन्स थ्रिलर बनतो की तुम्ही त्यात पूर्णपणे गुंतून जाता.

या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. 'वध 2'मध्ये कोणताच हिरो नाही तर दोन सर्वसामान्य माणसांची असहायता आणि त्यांची भीषण कृत्ये दाखवली आहेत. कोणतीही अनावश्यक गाणी किंवा विनाकारण सब-प्लॉट नसलेला हा 131 मिनिटांचा चित्रपट थेट मूळ मुद्द्यांवर भाष्य करतो.

या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. 'वध 2'मध्ये कोणताच हिरो नाही, तर दोन सर्वसामान्य माणसांची असहायता आणि त्यांची भीषण कृत्ये दाखवली आहेत. कोणतीही अनावश्यक गाणी किंवा विनाकारण सब-प्लॉट नसलेला हा 131 मिनिटांचा चित्रपट थेट मूळ मुद्द्यांवर भाष्य करतो.

'वध 2' हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपट आणि सीरिजच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर आहे. मर्डर मिस्ट्री सस्पेन्स आणि थ्रिलरचे तुम्ही चाहते असाल तर हा चित्रपट आवर्जून पहा. आयएमडीबीवर या चित्रपटाला 7.5 रेटिंग मिळाली आहे.

'वध 2' हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपट आणि सीरिजच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर आहे. मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स आणि थ्रिलरचे तुम्ही चाहते असाल, तर हा चित्रपट आवर्जून पहा. आयएमडीबीवर या चित्रपटाला 7.5 रेटिंग मिळाली आहे.

'वध 2' हा चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता तो ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जसपाल सिंह संधू यांनी केलंय. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वध' या चित्रपटाचा हा स्पिरिच्युअल सीक्वेल आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मृत व्यक्तीचा ITR भरणे आवश्यक? कायदेशीर वारसावर असते ‘ही’ मोठी जबाबदारी
  • इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?
  • मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ
  • विमानात अचानक मृत्यू झाल्यास काय असतात नियम? इमर्जन्सी लँडिंग करता येते का?
  • उकडलेले बदाम खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in