• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

13 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते रजनीकांत, घरी पोहोताच झालेला अपशकुन… तिच्या मृत्यूने हादरलेला देश

April 9, 2026 by admin Leave a Comment


साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, जगभरात फार मोठी आहे. रजनीकांत यांचा कूल अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. रजनीकांत यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहितीन नाही. आज रजनीकांत त्यांच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत, पण एक काळ असा देखील होता, जेव्हा रजनीकांत स्वतःपेक्षा 13 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेले.

रजनीकांत अभिनेत्रीच्या कुटुंबियाकडे लग्नाची मागणी घालण्यासाठी देखील गेलेल… पण त्यांचं लग्न काही होऊ शकलं नाही. पण एक अपशकुन झाला… सांगायचं झालं, अभिनेत्री फक्त 16 वर्षांची होती… रजनीकांत यांनी वयाच्या 29 व्या वर्षी सिने विश्वात स्वतःची ओळख भक्कम केलेली. तर 16 वर्षांची अभिनेत्री स्वतःची ओळख निर्माण करत होती. तिच्या निरागसतेने, अभिनयाने आणि पडद्यावरील उपस्थितीने सर्वांच्या मनावर खोलवर प्रभाव टाकला. तिच्या साधेपणाने आणि सौंदर्याने मोहित झालेले रजनीकांतसुद्धा, आपल्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या त्या मुलीच्या प्रेमात पडले.

पण तेव्हा कोणालाच माहिती नव्हतं की, ही 16 वर्षांची मुलगी एक दिवस बॉलिवूडवर राज्य करेल. ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात रजनीाकांत होते, तिने वयाच्या 13 व्या वर्षी सिनेमात त्यांच्या आईची भूमिका बजावली होती… अभिनेत्रीने फक्त साउथच नाही तर, हिंदी सिनेविश्वार देखील राज्य केलं…

थलायवाने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना लग्नाच्या निर्णयाबद्दल सांगण्याचं ठरवलं आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण एक अशुभ घटना घडली, ज्यामुळे त्यांची प्रेमकथा सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती, अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आहेत…

रजनीकांत 16 वर्षीय श्रीदेवी यांच्या प्रेमात असे पडले की, त्यांच्यासोबत लग्न करण्याची देखील त्यांची इच्छा होती. यासाठी ते श्रीदेवी यांच्या आईसोबत बोलण्यासाठी देखील गेले. पण तेव्हाच एक अशुभ घटना घडली. श्रीदेवी यांच्या नव्या घराचं गृहप्रवेश होतं, त्याच मुहूर्तावर रजनीकांत देखील पोहोचले आणि त्यांनी घरात पाय ठेवताच लाईट गेली… त्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही…

श्रीदेवी यांचं निधन

वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. भाच्याच्या लग्नात गेलेल्या श्रीदेवी यांचं निधन दुबईत झालं. दुबईतील एका हॉटेलच्या खोलीत अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. श्रीदेवी यांच्या अकस्मित निधनाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा
  • 5 मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट ऐकून दिला नकार, पण नवीन कलाकारांमुळे ठरला ब्लॉकबस्टर, 22 वर्षांपूर्वी झालेला रिलीज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in