• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

12 दिवसीय ‘ट्राइब्स आर्ट फेस्ट 2026’ नवी दिल्लीत संपन्न; 1.25 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या आदिवासी कलाकृतींची विक्री

March 14, 2026 by admin Leave a Comment


नवी दिल्ली, 13 मार्च 2026 : ट्राइब्स आर्ट फेस्ट 2026 हा महोत्सव आदिवासी व्यवहार मंत्रायलाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 12 दिवस चाललेल्या या महोत्सवाचा समारोप आज त्रावणकोर प्लेस, के. जी. मार्ग, नवी दिल्ली येथे भव्य समारोप समारंभाने झाला. या महोत्सवात देशभरातील आदिवासी कलाकार, समकालीन कलाकार, सांस्कृतिक गट, विद्यार्थी आणि कला रसिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या प्रदर्शनाला 10,000 हून अधिक अभ्यागतांनी भेट दिली, ज्यामुळे भारतातील समृद्ध आदिवासी कला परंपरांबद्दल वाढत असलेली लोकांची आवड आणि कदर दिसून आली. या महोत्सवाने 30 पेक्षा अधिक आदिवासी कला प्रकार, 70 कलाकार आणि 1000 हून अधिक कलाकृती एकाच व्यासपीठावर सादर केल्या. यावेळी समकालीन कलाकारांनी आदिवासी कलाकारांसोबत सहकार्य करून पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक कलापद्धती यांचा सुंदर संगम घडवला.

महोत्सवात हँड्स-ऑन कार्यशाळा, थेट कला प्रात्यक्षिके आणि संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली, ज्यामुळे अभ्यागतांना आदिवासी कला आणि परंपरांचा जवळून अनुभव घेता आला. देशातील विविध भागांतील आदिवासी सांस्कृतिक गटांनी पारंपरिक संगीत आणि नृत्य सादर करून कार्यक्रम अधिक समृद्ध केला.

समारोप समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या आगमनाने आणि प्रदर्शनाच्या पाहणीने झाली. त्यानंतर वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची पुढील सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओरम उपस्थित होते. सन्माननीय पाहुणे म्हणून केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके उपस्थित होते. याशिवाय प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जय मदन आणि ज्योत्सना सुरी तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सचिव रंजना चोप्रा यांनी सांगितले की, ‘हा खरोखर यशस्वी प्रयोग ठरला आहे. आर्ट गॅलरी व्यवस्था, कॉर्पोरेट खरेदीदार आणि संस्थात्मक सहकार्य यांना एकत्र आणून आम्ही असे व्यासपीठ निर्माण केले आहे जे केवळ आदिवासी कला प्रदर्शित करत नाही तर कलाकारांच्या उपजीविकेलाही थेट बळ देते.

त्या पुढे म्हणाल्या की, मंत्रालय पायाभूत सुविधांच्या विकासावर काम करत असतानाच उपजीविकेच्या संधींवरही भर देत आहे. आदिवासी समाजात कला आणि उपजीविका यांच्यात अतिशय जवळचा संबंध आहे, कारण त्यांची कला ही त्यांच्या ओळखीची आणि परंपरेची जिवंत अभिव्यक्ती आहे.

रंजना चोपडा पुढे म्हणाल्या की केवळ, 10 दिवसांत ₹1.25 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या कलाकृतींची विक्री झाली. काही कलाकारांचे नियमित मासिक उत्पन्न सुमारे 25000 असते, पण या व्यासपीठामुळे काही कलाकार जवळपास 7 लाखांपर्यंत कमाई करून घरी परतत आहेत, ही या उपक्रमाची मोठी कामगिरी आहे.

आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी सांगितले की, आदिवासी कला ही निसर्ग, संस्कृती आणि परंपरेशी असलेल्या आदिवासी समाजाच्या खोल नात्याचे प्रतिबिंब आहे. या कलाकृती केवळ सौंदर्यदृष्टी नसून त्या समाजाच्या दैनंदिन जीवन, श्रद्धा आणि सामूहिक स्मृतींशी जोडलेल्या आहेत. रंग, आकृत्या आणि कथन परंपरांमधून शतकानुशतके जुनी ज्ञानपरंपरा पुढे नेली जाते.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्रालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की अशा कार्यक्रमांमुळे देशातील विविध भागांतील कलाकारांना राष्ट्रीय राजधानीत आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि नागरिकांना आदिवासी संस्कृती जवळून अनुभवता येते.

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी कलाकार, कला रसिक आणि संस्थांना एकत्र आणणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, आदिवासी कला केवळ दृश्य अभिव्यक्ती नाही, तर ती समाजाच्या ज्ञान, स्मृती आणि परंपरांचे जिवंत दस्तऐवज आहे. प्रत्येक रेषा आणि रंग कलाकाराच्या भावनांचे आणि निसर्गाशी जोडलेल्या जीवनदृष्टीचे प्रतीक असतात.

आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओरम यांनी सांगितले की भारतातील आदिवासी समाजाकडे अद्वितीय कला, संस्कृती, वारसा, पाकपरंपरा आणि पारंपरिक ज्ञान आहे. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या या परंपरा निसर्ग आणि समाजाशी असलेल्या खोल नात्याचे दर्शन घडवतात. त्यांनी सांगितले की आदिवासी समाजासाठी शाश्वत आणि सन्मानजनक उपजीविका निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि अशा उपक्रमांना पुढेही चालना दिली जाईल.

समारंभात विविध श्रेणींमध्ये कलाकारांचा सन्मान करण्यात आला

  • सर्वोत्कृष्ट आदिवासी कलाकार: राजेश चैत्य वांगड
  • यंग अचीव्हर इन ट्रायबल आर्ट: धनश्वर धुर्वे आणि सुधा कुमारी
  • नवोन्मेष (इनोव्हेशन) इन ट्रायबल आर्ट: लैश्रम मेम्बी देवी
  • आदिवासी कला पुनरुज्जीवनासाठी योगदान: बालासुब्रमणी
  • आदिवासी कलेसाठी आयुष्यभराचे योगदान: पुतली गंजी

प्रदर्शनादरम्यान सुरेश चंद्र पुंगाटी, राजेश चैत्य वांगड, राजकुमार सोडी, मंगला बाई, भुरी बाई, अनिल चैत्य वांगड, किंग्सन स्वर्गियारी, रामसिंग उरवेती, वेंकट रमन सिंह श्याम आणि सुखनंदी व्याम यांच्या कलाकृतींना खरेदीदारांकडून मोठी मागणी मिळाली.

12 दिवसांच्या या प्रदर्शनात 800 पेक्षा जास्त कलाकृती विकल्या गेल्या, ज्यातून ₹1.25 कोटींपेक्षा अधिक थेट विक्री झाली. कला रसिक, संग्राहक आणि अभ्यागतांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आदिवासी कलेबद्दल वाढती प्रशंसा दर्शवतो आणि कलाकारांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार देतो.

या कार्यक्रमाचा समारोप अनंत प्रकाश पांडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व सहकारी संस्था, सहभागी कलाकार आणि आयोजकांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले आणि अभ्यागतांच्या उत्साही प्रतिसादाबद्दल आभार मानले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याणमध्ये तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह
  • तीन दिवसानंतर थेट खातं बंद, पैसेच काढता येणार नाही, तुमचं तर या बँकेत खातं नाही ना?
  • युझवेंद्र चहलने ते व्हिडीओ पाठवत मेसेज केला; ‘गंदी बात’ अभिनेत्रीने सर्वांसमोर चॅटच दाखवले
  • MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन सुरु होण्याआधीच मोठा पराक्रम, अवघ्या 3 तासात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in