• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

100 पेक्षा अधिक चित्रपटात केलं काम, पण 13 वर्षांमध्ये दिला एकही हिट, संपत्ती पाहून उडतील होश

February 8, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Actress : गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असूनही कोट्यवधींची संपत्ती वाढवत असलेली अभिनेत्री म्हणून जूही चावलाचं नाव आजही आवर्जून घेतलं जातं. साधारणपणे एखादी अभिनेत्री सात–आठ वर्षे थिएटर रिलीजपासून दूर राहिली आणि अनेक वर्षांपासून एकही मोठा हिट चित्रपट दिला नाही तर त्याची कमाई कमी होते. मात्र जूही चावलांच्या बाबतीत ही गोष्ट पूर्णपणे उलटे ठरले. अभिनयापासून काहीशी दूर राहूनही ती आज देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

जवळपास 40 वर्षांपूर्वी1986 साली आलेल्या ‘सल्तनत’ या चित्रपटातून जूही चावलाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या सुपरहिट चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. आमिर खानसोबत झळकलेल्या या चित्रपटानंतर जूही रातोरात स्टार बनली.
यानंतर तिने एकामागोमाग एक हिट चित्रपट दिले आणि हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचं स्थान पक्कं केलं.

100 हून अधिक चित्रपटांचा प्रवास

जूही चावलाने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदीसोबतच तिने दाक्षिणात्य आणि इतर भाषांमधील चित्रपटांतही भूमिका साकारल्या. 1991 साली ती सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ‘नातुक्कु ओरु नल्लवन’ या तामिळ चित्रपटातही झळकली होती. कालांतराने तिने मुख्य भूमिका कमी करत कॅमिओ किंवा लहान पण महत्त्वाच्या भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. त्यामुळे गेल्या सुमारे 13 वर्षांत तिने कोणतीही हिट चित्रपट दिला नाही.

चित्रपटांमधील काम कमी झालं असलं तरी जूही चावलाची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. उलट, तिने अत्यंत दूरदृष्टीने व्यवसाय आणि गुंतवणुकीकडे आपला मोर्चा वळवला. 2024-25 च्या हुरुन रिच लिस्टनुसार जूही चावलाची एकूण संपत्ती सुमारे 4600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चित्रपटांमधून येणारी कमाई कमी झाली असली तरी स्मार्ट इन्व्हेस्टमेंटमुळे तिची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली.

IPL, प्रोडक्शन आणि मोठ्या गुंतवणुका

जूही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री सर्वश्रुत आहे. दोघे मिळून आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सचे को-ओनर आहेत. रिपोर्ट्सनुसार या टीममध्ये जूही चावलाची गुंतवणूक सुमारे 623 कोटी रुपये इतकी आहे. फोर्ब्सनुसार, कोलकाता नाइट रायडर्सची सध्याची बाजारमूल्यं सुमारे 9139 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय त्ती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रोडक्शन कंपनीची देखील को-ओनर आहे. तसेच सौराष्ट्र सिमेंटमध्येही तिची भागीदारी आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in