• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

March 11, 2026 by admin Leave a Comment


आपण अनेकदा एटीएममधून पैसे काढताना फक्त ५०० किंवा २०० रुपयांच्या मोठ्या नोटा हातात येतात. ज्यामुळे दैनंदिन व्यवहारात सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण होते. मात्र, आता ही समस्या लवकरच सुटणार आहे.

bank notes (1)

केंद्र सरकारने नुकतंच संसदेत माहिती दिली आहे की, नागरिक आता १०, २० आणि ५० रुपयांच्या लहान नोटा थेट एटीएममधून काढू शकणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर (Small Value Dispenser) नावाचा एक विशेष पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे.

bank notes (2)

राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या योजनेची माहिती दिली. हे एक प्रकारचे विशेष एटीएम असेल, जे केवळ १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा वितरित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे.

bank notes (3)

सध्याच्या पारंपारिक एटीएममध्ये कॅसेटची क्षमता मर्यादित असल्याने बँका मोठ्या नोटांना प्राधान्य देतात. या नवीन मशिनमुळे सर्वसामान्यांना किरकोळ खर्चासाठी बँकांच्या रांगेत उभे राहण्याची किंवा बाजारात सुट्या पैशांसाठी फिरण्याची गरज पडणार नाही.

bank notes (4)

तसेच गेल्या काही दिवसांपासून बाजारात नोटांचा तुटवडा आहे, अशा अफवा पसरल्या आहेत. आता त्याला सरकारने पूर्णविराम दिला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत १० रुपयांच्या ४३९.४० कोटी, २० रुपयांच्या १९३.७० कोटी आणि ५० रुपयांच्या १३०.३० कोटी नोटांचा पुरवठा करण्यात आला आहे.

bank notes (2)

विशेषतः १० रुपयांच्या नोटांच्या पुरवठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. सध्या डिजिटल पेमेंटचा (UPI) प्रभाव वाढत आहे. पण तरी ग्रामीण आणि निमशहरी भागात रोख रकमेची गरज लागते.

bank notes (3)

ही गरज ओळखून आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. सध्या रिक्षा भाडे, भाजीपाला किंवा किरकोळ खरेदीसाठी सुट्या पैशांची होणारी ओढाताण थांबून पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.

bank notes (4)

या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे केवळ सर्वसामान्यांची सुट्या पैशांसाठी होणारी वणवण थांबणार आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे. डिजिटल युगातही रोख रकमेचे महत्त्व ओळखून सरकारने उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in