• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 वर्षात 127 किलो सोन्याची तस्करी, ही अभिनेत्री शरीरात लपवून आणायची सोनं, नाव ऐकून..

March 25, 2026 by admin Leave a Comment


कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या राव हिचं नाव अलीकडेच मोठ्या वादात समोर आलं आहे. सोने तस्करी प्रकरणात ED ने दाखल केलेल्या चार्जशीटमधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा प्रकार एखाद्या छोट्या गुन्ह्यापुरता मर्यादित नसून आफ्रिकेतून सुरू होऊन दुबईमार्गे भारतात पोहोचलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे.

सुरुवातीला रान्या आणि तिचा सहकारी तरुण कोंडूरू यांनी युगांडा, केन्या आणि टांझानिया येथून थेट सोने आयात करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी दुबईमध्ये ‘वीरा डायमंड्स ट्रेडिंग LLC’ ही कंपनीही सुरू केली. सुरुवातीला 5 किलो सोन्याची डील ठरली होती, त्यानंतर 50 किलोचा मोठा व्यवहार करण्याची योजना होती.

15 वेळा दुबई-भारत प्रवास

मात्र, मोठी रक्कम आगाऊ दिल्यानंतरही त्यांना सोने मिळालं नाही आणि सुमारे 2 कोटी रुपयांची फसवणूक झाली. यानंतर त्यांनी रणनीती बदलत दुबईतील स्थानिक बाजारातून रोख पैशांत सोने खरेदी करण्यास सुरुवात केली. रान्या मोठ्या प्रमाणात कॅश घेऊन दुबईला जात असे आणि तिथून सोने खरेदी करून भारतात आणत असे.

तपासात उघड झाल्यानुसार, मार्च 2024 ते मार्च 2025 दरम्यान तिने सुमारे 15 वेळा दुबई-भारत प्रवास केला आणि जवळपास 127.87 किलो सोन्याची तस्करी केली. या सोन्याची किंमत अंदाजे 102 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

रान्याचे खरे नाव काय?

या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने FIR नोंदवली असून ED ने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ED ने रान्याच्या 34 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी होते, याचा तपास सुरू आहे. रान्याचं खरं नाव हर्षवर्धिनी रान्या असून तिने 2014 मध्ये ‘माणिक्य’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 2014 ते 2017 दरम्यान ती काही कन्नड चित्रपटांमध्ये झळकली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • Maharashtra News LIVE : लवकरच ‘ऑपरेशन टायगर’? दरेगावातून एकनाथ शिंदे सक्रीय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in