• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 तास 58 मिनिटांचा हॉरर चित्रपट, बजेटपेक्षा तीन पट अधिक कमाई, आता OOT वर करतोय ट्रेंड, IMDb रेटिंग 8.6

February 8, 2026 by admin Leave a Comment


भारतीय प्रेक्षकांना हॉरर कंटेंटच्या बाबतीत नेहमीच काहीतरी वेगळं, अधिक थरारक आणि अंगावर काटा आणणारं बघायची अपेक्षा असते. त्यामुळेच अनेकदा प्रेक्षक बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि हॉलीवूडमधील हॉरर-थ्रिलर चित्रपटांकडे जास्त वळताना दिसतात. बॉलिवूडमधील पारंपरिक भुताटकी किंवा हॉरर कॉमेडी आता अनेकांना पुरेशी भीती वाटत नाही. 2026 च्या प्रेक्षकांची पसंती ही सस्पेन्स, सायकोलॉजिकल थ्रिल आणि भीतीकडे झुकलेली आहे.

अशाच एका जबरदस्त हॉरर-थ्रिलर चित्रपटाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याने रिलीज होताच संपूर्ण जगात खळबळ उडवली होती. या चित्रपटाचा प्रभाव इतका प्रचंड होता की त्याला तब्बल 5 ऑस्कर पुरस्कारांनी त्याला गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे, तब्बल 35 वर्षांनंतरही हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुफान पाहिला जात आहे.

35 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हॉरर चित्रपट

1991 साली प्रदर्शित झालेला ‘द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ हा चित्रपट आजही हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाचं भेसूर बॅकग्राऊंड म्युझिक, थरारक कथा आणि अचानक धक्का देणारे सीन पाहणाऱ्यांची अक्षरशः झोप उडवतात. त्यामुळेच हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

हा चित्रपट लेखक थॉमस हॅरिस यांच्या कादंबरीवर आधारित असून जोनाथन डेम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. कथानकाची खोली आणि मानसिक खेळ आजच्या अनेक हॉरर चित्रपटांनाही मागे टाकणारी आहे.

थरकाप उडवणारी कथा

या चित्रपटाची कथा एका एफबीआय एजंटभोवती फिरते, जो एका निर्दयी सीरियल किलरच्या शोधात आहे. हा किलर महिलांना आपलं शिकार बनवत असतो. या गुंतागुंतीच्या केसमध्ये मदत मिळवण्यासाठी एजंट एका अशा मानसोपचारतज्ज्ञाकडे जातो, जो स्वतः आधीच तुरुंगात बंद आहे. हा डॉक्टर अत्यंत चलाख आणि धोकादायक असतो. तो एजंटसमोर एक अट ठेवतो. एजंटने स्वतःच्या आयुष्यातील भीती, वेदना आणि वैयक्तिक गोष्टी त्याच्यासोबत शेअर केल्या तरच तो किलरविषयी माहिती देईल.

आजही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर उपलब्ध असून नव्या पिढीतील प्रेक्षक देखील तो आवर्जून पाहत आहेत. या चित्रपटाला IMDb वर 8.6 रेटिंग मिळालं आहे जे त्याच्या दर्जाचं स्पष्ट उदाहरण आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 100 पेक्षा अधिक चित्रपटात केलं काम, पण 13 वर्षांमध्ये दिला एकही हिट, संपत्ती पाहून उडतील होश
  • ज्याची भीती होती तेच घडलं; दोन शक्तीशाली देश थेट आमने -सामने, भारताशी कनेक्शन, तणाव वाढला
  • पोटदुखीच्या समस्या आरोग्याकडे दुर्लक्ष, होऊ शकतात गंभीर आजार……
  • ENG vs NEP : हलक्यात घ्यायचं काम नाय, हरले पण रडवून सोडलं, इंग्लंडचा नेपाळ विरुद्ध 4 धावांनी विजय
  • Vaibhav Suryavanshi : 15 चौकार-15 षटकार, वैभव सूर्यवंशीची 175 धावांची ऐतिहासिक खेळी, फायनलमध्ये 5 वर्ल्ड रेकॉर्ड्स

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in