• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 तास 34 मिनिटांचा हा चित्रपट अक्षरश: उडवेल झोप; IMDb वर दमदार रेटिंग

February 2, 2026 by admin Leave a Comment


हॉरर मिस्ट्री हा एक असा जॉनर आहे, जो प्रेक्षकांना घाबरवतो, पण तितकाच तो त्यांच्याच उत्साह निर्माण करतो. सिनेप्रेमी या गोष्टीला नाकारू शकत नाहीत. या जॉनरच्या चित्रपटाची कथा दमदार असेल तर प्रेक्षकांना ती शेवटपर्यंत खिळवून ठेवते. असाच एक चित्रपट सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय. हा चित्रपट अक्षरश: घाबरगुंडी उडवतो. यामध्ये असा विषय मांडण्यात आला आहे, जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. बोनस पॉईंट असा आहे की यातील कलाकारांचं अभिनयसुद्धा दमदार आहे. हे कलाकार चित्रपटाच्या कथेला पूर्ण न्याय देतात. या हॉरर मिस्ट्रीमध्ये 19 व्या शतकातील बंगालमध्ये घडणाऱ्या एका सुपरनॅच्युरल स्त्री-वादाची कथा दाखवण्यात आली आहे.

एका श्रीमंत कुटुंबात लग्न झालेल्या आणि लग्नानंतर प्रचंड छळाला सामोरं जाणाऱ्या एका अल्पवयीन वधूची ही कथा आहे. एका रात्री तिच्यासोबत भयानक घटना घडते, ज्यामुळे तिचं रुपांतर एका रहस्यमयी वनदेवीमध्ये होतं, जी अत्याचाराला सामोरं जाणाऱ्या इतर महिलांचं रक्षण करते. तेव्हा हळूहळू गावातील पुरुषांचा गूढ मृत्यू होतो. वधूचा मेहुणा या हत्येमागील सत्य आणि तिच्या दु:खद भूतकाळाचा उलगडा करण्यासाठी परत येतो, तेव्हा ही कथा उलगडत जाते. जी मुलगी अत्यंत खेळकर, मनमोकळ्या स्वभावाची असते, ती लग्नानंतर पूर्णपणे बदलते. पुरुषप्रधान वृत्तीतून झालेल्या छळामुळे ती तिची निरागसता पूर्णपणे गमावते. त्यातूनच तिची सूड घेण्याची वृत्ती जागृत होते.

ज्या चित्रपटाबद्दल आम्ही इथे सांगत आहोत, त्या चित्रपटाचं नाव आहे ‘बुलबुल’. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिच्या भावाने केली होती. यामध्ये तृप्ती डिमरीने मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अविनाश तिवारी, पाओली दाम, राहुल बोस यांच्याही भूमिका आहेत. 1880 च्या दशकातील बंगाल प्रेसिडेन्सीवर आधारित हा चित्रपट एका बालवधूभोवती आणि तिच्या एकंदर प्रवासाभोवती फिरते. बुलबुल हा चित्रपट 24 जून 2020 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आजही तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in