• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

0..2..4..6 आणि 91! कर्णधार इशान किशनचा झंझावात, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना झोडलं

April 13, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 21व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने सनरायझर्स हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर हैदराबादला धक्का बसला. अभिषेक शर्मा खातं न खोलता तंबूत परतला. त्यामुळे संघ अडचणीत आला होता. पण कर्णधार इशान किशनने संघाला अडचणीतून बाहेर काढलं. इतकंच काय तर ट्रेव्हिस हेडची विकेट पडल्यानंतर त्याचा झंझावात काही थांबला नाही. त्याने आक्रमक बाणा कायम ठेवला. इशान किशनने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने आपल्या भात्यातून चौकार आणि षटकारांचे बाण काढले. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज पुरते हतबल दिसले. त्याने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. त्याचं शतक अवघ्या 9 धावांनी हुकलं.

आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने 44 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 91 धावांची खेळी केली. त्याने 206.82 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारताना अंदाज चुकला. स्लो बॉलवर त्याच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि वर चढला. संदीप शर्माने धावत जात स्वत: झेल पकडला. खरं तर विकेटकीपर जुरेल झेल पकडण्यासाठी सरसावला होता. त्यामुळे दोघांची टक्कर झाली, पण संदीपने झेल सोडला नाही. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली पण ऑरेंज कॅपचा मान हुकला.

राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना होण्यापूर्वी वैभव सूर्यवंशी 200 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पुढे होता. पण इशान किशनने या सामन्यात 91 धावांची खेळी आणि 213 धावांसह त्याच्या पुढे निघून गेला. पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हेनरिक क्लासेन पुढच्या काही धावा करत इशानला मागे टाकलं. इशान किशन बाद होताच काही धावा काढल्या आणि 213 धावांचा टप्पा ओलांडला. या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. या दोघांना पुन्हा एकदा टॉपला येण्याची संधी आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा
  • SRH vs RR : कॅप्टन इशान किशनचा तडाखा, राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट, हैदराबाद सलग पाचव्या विजयापासून रोखणार?
  • हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video
  • बाईक, सेल्फीस्टिक आणि मोबाईल लोकेशन… सोलो ट्रेकरचा मृत्यू, 300 फूट दरीत कोसळून अंत; त्या डोंगरात नेमकं काय घडलं?
  • तर भारताला सर्वात मोठा फटका, इराणकडून भयंकर संकटाची चाहूल; युद्ध न थांबवल्यास…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in