• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ॲसिडिटीची समस्या सतावत असेल तर ‘या’ फळांचे चुकूनही करू नका सेवन

February 13, 2026 by admin Leave a Comment


बदलत्या जीवनशैलीमुळे अयोग्य आहारपद्धती, अस्वस्थ खाण्या-पिण्याच्या सवयी आणि फास्ट फूडचे जास्त सेवनामुळे अ‍ॅसिडिटीची सामान्य समस्या अधिक तीव्र होते. अनेकांना या समस्येचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कारण की डाएटमध्ये असलेली काही अशी फळं आहेत जी आरोग्यदायी मानली जातात परंतु ही फळे ॲसिडिटीची समस्या उद्भवणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. तुम्हालाही ॲसिडिटीची समस्या सतावत असेल तर काही अशी फळं आहेत जी आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. तर आजच्या लेखात आपण अ‍ॅसिडिटी झाल्यास कोणती फळांचे सेवन करणे टाळावे आणि का ते जाणून घेऊयात.

1. संत्र

तुम्हाला जर सतत ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर संत्र्यांचे सेवन करणे टाळावेत. जरी ते व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्रोत असले तरी त्यात सायट्रिक ॲसिड असते. संत्री खाल्ल्याने छातीत जळजळ आणि ॲसिड रिफ्लक्स वाढू शकते.

2. लिंबू

तुम्हाला जर ॲसिडिटी होत असेल तर लिंबू खाणे टाळावे. त्यात तीव्र गॅस्ट्रिक ॲसिड असते जे ॲसिडिटी वाढवू शकते, विशेषतः रिकाम्या पोटी सेवन केल्यास.

3. अननस

तुम्हाला जर अ‍ॅसिडिटी असेल तर अननस देखील खाणे टाळावे. हेल्थलाइनच्या मते, त्यात सायट्रिक ॲसिड आणि ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते, जे पोटातील ॲसिड वाढवू शकते आणि छातीत जळजळ होऊ शकते.

4. कैरी

आयुर्वेदात कैरी खाण्यासही मनाई केले जात आहे. त्यात सायट्रिक, मॅलिक आणि ऑक्सॅलिक ॲसिड असतात, जे पित्त वाढवतात ज्यामुळे छातीत जळजळ आणि आम्लता होते.

5. पेरू

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यात कडक बिया असतात, ज्या पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे कमकुवत पचनसंस्था असलेल्यांसाठी पेरूचे सेवन हानिकारक ठरू शकते. त्यांच्या अपचनक्षमतेमुळे ते आम्लता वाढवू शकतात.

6. द्राक्ष

द्राक्षे हे अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहेत. त्यांचे सेवन केल्याने पित्त वाढते. त्यात सायट्रिक आणि टार्टेरिक आम्लांचे प्रमाण जास्त असते. हे आम्ल पोटातील आम्ल आणखी वाढवू शकतात, विशेषतः रिकाम्या पोटी सेवन केल्यास छातीत जळजळ होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in