• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

८ वा वेतन आयोग: १ जानेवारी २०२६ नंतर कोणाचा पगार वाढणार, ज्युनिअर की सिनिअर ऑफीसर ?

December 30, 2025 by admin Leave a Comment


देशातील ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचे डोळे या समयी ८ व्या वेतन आयोगावर खिळले आहेत. अशात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेशनर्सना नवीन वर्षे मोठा दिलासा घेऊन येणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून ८ वा वेतन आयोग (8th Pay Commission)ची शिफारस प्रभावी मानली जाते. सरकारने आधीच आठवा केंद्रीय वेतन आयोगाच्या (CPC) सदस्यांची नियुक्ती केली आहे. वेतन आयोगाला लागू होण्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. परंतू वाढलेले वेतन नंतर मिळणार असले तरी आयोग लागू होण्याच्या तारखेपासूनचा एरिअर मिळणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न ज्युनिअर कर्मचाऱ्यांना जास्त फायदा होणार की सिनियर कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे हे पाहूयात.

७ व्या वेतन आयोगाची मुदत संपली

सध्याचा ७ वा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्त होणार आहे. सरकारने आधीच ८ व्या वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे. याची टर्म्स आणि रेफरन्स देखील निश्चित झालेले आहेत. सर्वसाधारणपणे वेतन आयोगाच्या सिफारशी १० वर्षात लागू होतात. अशात १ जानेवारी २०२६ नवी व्यवस्था लागू मानली जाणार आहे.

पगार लागलीच नाही, परंतू एरियर मिळणार

कर्मचाऱ्यांच्या हातात वाढलेला पगार आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतरच मिळणार आहे. परंतू उरलेल्या काळाचा एरिअर देखील मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार सरकार यावेळी एरियरची जटीलता पाहून वेतन सुधारणांची घोषणा लवकरच करु शकते.

फिटमेंट फॅक्टरने पगार निश्चिती

८ व्या वेतन आयोगात पगार वाढीचा आधार फिटमेंट फॅक्टर असणार आहे. हा तो गुणांक (multiplier) आहे. ज्यामुळे सध्याचा बेसिक पगाराला गुणाकार करुन नवा बेसिक पगार निश्चित केला जातो. ७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. या वेळी फिटमेंट फॅक्टर किती राहिल याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. यावेळी फिटमेंट फॅक्टर किती असेल याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अंदाज लावला जात आहे की ८ व्या वेतन आयोगात हा फॅक्टर १.९२ वा २.१५ असू शकतो.

कोणाला मिळणार जास्त फायदा?

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना १८ लेव्हलमध्ये वाटले गेले आहे.

लेव्हल १ मध्ये एण्ट्री लेव्हल/ग्रुप D कर्मचारी

लेव्हल २ ते ९ मधील ग्रुप C कर्मचारी

लेव्हल १० से १२: ग्रुप B अधिकारी

लेव्हल १३ से १८: ग्रुप A अधिकारी

किती वाढू शकतो पगार ( अंदाजित आकडे )

लेव्हल सध्याचे बेसिक वेतन (₹) 1.92 फॅक्टर (₹) वाढ (₹) 2.15 फॅक्टर (₹) वाढ (₹)
लेव्हल 1 18,000 34,560 16,560 38,700 20,700
लेव्हल 5 29,200 56,064 26,864 62,780 33,580
लेव्हल 10 56,100 1,07,712 51,612 1,20,615 64,515
लेव्हल 15 1,82,200 3,49,824 1,67,624 3,91,730 2,09,530
लेव्हल 18 2,50,000 4,80,000 2,30,000 5,37,500 2,87,500



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा शेवटच्या क्षणी थेट राजीनामा; पक्षात मोठी खळबळ!
  • Ajit Pawar NCP : दादांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट, उमेदवारांच्या निवड प्रक्रियेवर सवाल
  • Pune Crime : जमिनीच्या वादातून फॉर्च्यूनर अंगावर घालण्याचा प्रयत्न, कोयत्याने तोडफोड, कुटुंबाला मारहाण
  • युतीचं कुठं घडलंय, कुठे बिघडलंय… पाहा 29 महापालिकेची डिटेल्स
  • Gold Rate : सोन्याला आले वाईट दिवस, एकाच दिवसात भाव धाडकन खाली आला, 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in