• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…

April 10, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम आशियातील तणावानंतर झालेल्या युद्धविरामानंतर इंधन वाहतूकीसाठी कळीची असलेल्या होर्मुझ स्ट्रेटमधून पुन्हा जहाजांची वाहतूक सुरु होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, ५ एप्रिलनंतर येथून कोणतेही भारतीय ध्वज लावलेले जहाज होर्मुझ पार करु शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदल सध्याच्या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. आणि सुरक्षित वातावरण झाल्याची खात्री झाल्यानंतरच जहाजांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.

सध्या भारतीय ध्वज लावलेली १६ जहाजे होर्मुझच्या पश्चिम भागात ( फारसची आखात ) अडकलेले आहेत. या एलएनजी(LNG), एलपीजी(LPG) , कच्चे तेलाची वाहतूक करणारी जहाजे, कंटेरन जहाजे आणि ड्रेजर तसेच रासायनिक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या जहाजांचा समावेश आहे.

एलपीजीची वाहतूक करणारे ‘जग विक्रम’हे जहाज अजूनही शारजाह मध्ये उभे आहे आणि आदेशाची वाट पाहात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात ५ ते ६ जहाजांना लवकरच नौदलाचे क्लिअरन्स मिळाल्यानंतर होर्मुझ पार करता येणार आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार ५ ते ६ जहाजांची पहिली तुकडी लवकरच नौदलाच्या हिरव्या झेंडा मिळाल्यानंतर होर्मुझ पार करु शकणार आहे.या संदर्भात इराणचे अधिकारी आणि चालक दलाशी बोलणी सुरु आहेत. युद्धाच्या दरम्यान एकूण २५ भारतीय जहाजे या क्षेत्रात उपस्थित होती. ज्यातील ९ जहाजे आतापर्यंत होर्मुझ सुखरुपपणे पार करु शकले आहेत. भारतीय नौदलाच्या तैनातीत सध्या कोणताही बदल केलेला नाही. आणि एस्कॉर्ट मोहिम सतत सुरु आहे. नौदल सुरक्षित मार्गांवरुन जहाजांना मार्गदर्शन करत आहे आणि त्यांना ओमानच्या खाडीपर्यंत सुरक्षा देण्यात आली आहे.

अजूनही जोखीम कायम

गुरुग्राम स्थित भारतीय नौदलाच्या इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर–इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)च्या माहितीनुसार युद्धाच्या सुरुवातीपासून ६ एप्रिलपर्यंत फारसची खाडी, होर्मुझ आणि ओमानच्या खाडीत ३० घटनांची नोंद झाली आहे. यात २३ जहाजांना टार्गेट करण्यात आले. ज्यात मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा समावेश होता, या घटनेत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यांवरुन कळते की येथे किती अस्थिरता आणि जोखीम कायम आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर
  • मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी सावधान, मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
  • 747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in