• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होर्मुज खाडीत भारताचा मोठा विजय, थेट अत्यंत आनंदाची बातमी, होर्मुजची सामुद्रधुनी दोन…

March 21, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराण पेटून उठला आणि ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे हल्ले केले. त्यांची रडार सिस्टम इराणच्या निशाण्यावर होती. कोणालाही वाटले नव्हते की, या युद्धात इतक्या खतरनाक पद्धतीने इराण मैदानात उतरेल. अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. त्यानंतर इराण अधिक घातक बनला. अमेरिकेने अनेक धमक्या देऊनही इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आली नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांत कच्च्या तेलाची आणि गॅसची आणीबाणी लागू झाली. भारतातही एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, इराणचा पूर्ण ताबा या खाडीत आहे.

समुद्राद्वारे वाहतूक होणाऱ्या जगातील एकूण तेल आणि वायूपैकी सुमारे 20 टक्के वाहतूक केवळ एकाच मार्गातून होते तो म्हणजे होर्मुजची सामुद्रधुनी. ही होर्मुजची खाडीच बंद असल्याने जगातील अनेक देशांची झोप उडाली. यादरम्यान भारताला मोठे यश मिळाले. होर्मुज खाडीत मोठा जाम लागलेल्या असताना भारताचे जहाज इराणकडून सोडली जात आहेत. भारतीय जहाजांना परवानगी दिली जात आहे.

ज्या जहाला परवानगी नाही, असे जहाज तिथून जात असेल तर थेट इराण त्या जहाला आग लावून देत आहे. आता भारतासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. थेट होर्मुज खाडीतून भारताचे अजून दोन जहाज सुरक्षित निघणार आहेत. यामुळे एलपीजी गॅसचे संकट कमी होण्याची शक्यता आहे. सध्या देशात व्यावसायिक सिलेंडरचे वितरण बंद करण्यात आले.

होर्मुज खाडीत भारताचे 22 जहाज अडकून पडले आहेत. ते जहाज ना पुढे येऊ शकत आहेत ना मागे जाऊ शकत आहेत. यापैकी दोन जहाजे विशेषतः चर्चेत आहेत. पाइन गॅस आईओसी जे इंडियन ऑइलने भाड्याने घेतले आहे. जग वसंत, जे बीपीसीएलने भाड्याने घेतले आहे. हे दोन्ही एलपीजी टॅंकर आहेत. हे दोन्ही जहाज होर्मुज खाडीतून निघणार असल्याची माहिती मिळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in