• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होऊ दे खर्च! 29 नगरसेवक, ताजच्या 35 खोल्या अन् दिवसाचे भाडे… बिलाचा आकडा पाहून डोळे पांढरे होतील

January 21, 2026 by admin Leave a Comment


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुंबई महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आले.

taj lands end room price eknath shinde 6

यानंतर शिंदेंनी खबरदारी म्हणून सर्व नगरसेवकांना वांद्र्यातील आलिशान ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये तीन दिवस मुक्कामी ठेवलं होतं.

taj lands end room price eknath shinde 2

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना अशा प्रकारे पंचतारांकित हॉटेलमध्ये का ठेवण्यात आले? यावरून आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

taj lands end room price eknath shinde 5

त्यातच आता या पंचतारांकित वास्तव्यासाठी एकूण खर्च किती झाला, हा सध्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नगरसेवकांच्या मुक्कामासाठी हॉटेलमध्ये तब्बल ३५ खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या.

taj lands end room price eknath shinde 1

नगरसेवकांसह त्यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची संख्या ७० च्या आसपास होती. हॉटेलच्या या रुमचे एका दिवसाचे भाडे साधारणपणे २८ हजार ते ३३ हजार रुपयांच्या दरम्यान होते.

taj lands end room price eknath shinde 4

शिंदेंच्या २९ नगरसेवकांसह एकूण ७० जणांसाठी केवळ राहण्याचा खर्च अंदाजे ३६ लाख रुपयांच्या आसपास आहे. तसेच हॉटेलमधील कॉन्फरन्स हॉलचे भाडे तासाला ५०,००० रुपये होत, जिथे नगरसेवकांच्या बैठका पार पडल्या.

taj lands end room price eknath shinde 7

सत्ताधारी पक्षाकडून या मुक्कामाचे समर्थन करण्यात आले आहे. नवीन नगरसेवकांना महापालिकेतील कामकाजाची पद्धत, निधीचे नियोजन आणि तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी हे सत्र आयोजित केले होते.

taj lands end room price eknath shinde 3

तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या महिनाभराच्या तणावानंतर नगरसेवकांना एकत्र येऊन संवाद साधण्याची संधी मिळावी, तसेच विश्रांती घेता यावी, यासाठी हे बुकींग करण्यात आले होते.

taj lands end room price eknath shinde

तर दुसरीकडे, विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. बहुमत असतानाही नगरसेवकांना अशा प्रकारे नजरकैदेत का ठेवावे लागते? जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे का? असे सवाल विरोधकांनी विचारले आहेत.

eknath shinde 9

दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तास्थापनेपूर्वी हॉटेल पॉलिटिक्स नवे नाही, मात्र निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आणि बहुमत असतानाही सत्ताधारी पक्षाने ही खबरदारी घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आज अखेर हे सर्व नगरसेवक आपापल्या घरी परतले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gratuity Calculator: ग्रॅच्युइटी म्हणजे काय? जर तुमचा पगार 30 हजार असेल तर एका वर्षात किती रक्कम मिळेल? वाचा…
  • मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला भाजपनेच ग्रीन सिग्नल दिला होता, 14 नोव्हेंबरला…,शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ
  • घृणास्पद, द्वेष अन् हिंसा..; ‘धुरंधर’वर ‘धडक 2’च्या दिग्दर्शिकेनं साधला निशाणा
  • GK : आईस्क्रीमचा शोध नेमका कधी लागला? इतिहास वाचून वाटेल आश्चर्य!
  • जगातील सर्वात खतरनाक मासा, एकाच वेळी घेऊ शकतो 30 लोकांचा जीव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in