• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हे 3 पदार्थ लिव्हरसाठी आहेत खूप घातक, आजपासूनच यांचे सेवन करणे टाळा

February 16, 2026 by admin Leave a Comment


यकृत हा आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा अवयव आहे. तर लिव्हर हे आपल्या शरीरात 500 हून अधिक महत्वाचे कार्य करत असतो.जसे की शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतो. पचनास मदत करतो, ऊर्जा साठवणे, रक्तातील प्रथिने तयार करणे, संसर्गाशी लढणे, म्हणूनच स्वतःला रोगमुक्त ठेवण्यासाठी ते निरोगी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि लिव्हरची काळजी घेणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. पण तुम्हाला माहित आहे का की काही तज्ञांच्या मते तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात असे तीन पदार्थ खात आहात ज्यामुळे तुमचे लिव्हर म्हणजेच यकृत निरोगी ठेवत नाहीयेत तर प्रत्यक्षात ते कमकुवत करत आहेत. तर हे तीन पदार्थ कोणते आहेत ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

तज्ञांच्या मते फॅटी लिव्हर ही समस्या भारतात वेगाने वाढत आहे. सुमारे 20 ते 25 टक्के भारतीयांना याचा त्रास आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रोजच्या आहारातील काही सामान्य पदार्थांचे सेवन करणे.

यकृतासाठी सर्वात वाईट अन्न कोणते आहे?

साखरयुक्त पेय: तज्ञांच्या मते साखरयुक्त ही पेये लिव्हरसाठी द्रव विषासारखी काम करतात. सोडा, पॅकेज्ड फळांचे रस, एनर्जी ड्रिंक्स, गोड चहा किंवा कॉफी, यामध्ये भरपूर रिकाम्या कॅलरीज असतात आणि ते तुमच्या लिव्हरला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो.

तळलेले पदार्थ: तळलेले पदार्थ यकृताच्या पेशींना नुकसान पोहोचवून शरीरात तणाव वाढवतातच, शिवाय जळजळ देखील करतात. म्हणून, जर तुम्ही तळलेले पदार्थांचे चाहते असाल, तर आजच ही सवय बदला, अन्यथा तुमच्या लिव्हरला मोठे नुकसान होऊ शकते.

अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ: जर तुम्ही चिप्स, कँडी, गोड धान्ये, हॉट डॉग आणि इन्स्टंट नूडल्स सारख्या अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचे चाहते असाल तर आजच ही सवय सोडा. कारण हे लिव्हरच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकतात. फॅटी लिव्हर डिसीज सारख्या लिव्हरच्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी हे पदार्थ सेवन करणे टाळा आणि संपूर्ण धान्य, फळे, भाज्या आणि हेल्दी फॅटयुक्त संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in