• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हे झाड म्हणजे सापाचा पक्का दोस्त; घरात चुकूनही लावू नका, साप बाहेर जाणारच नाही

April 8, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्यामध्ये साप बिळातून बाहेर निघण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. कारण जमीन तापल्यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास होतो. अशावेळी साप सुरक्षित आणि थंड निवाऱ्याच्या शोधात असतात. त्यामुळे ते तुमच्या घरात घुसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्यामध्ये देखील पावसाचं पाणी बिळात शिरल्यामुळे साप बिळातून वर येतात आणि निवाऱ्यासाठी कोरडी जागा शोधतात. त्यामुळे पावसाळा आणि उन्हाळ्यात संर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर चुकूनही वेळ न घालवता अशा व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचार मिळून दिले पाहिजे, त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे.

अनेकांना बागकामची आवड असते, अनेकजण आपल्या घराच्या परिसरात विविध फळांची, फुलांची झाडं लावतात. मात्र काही झाडं अशी असतात की त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप  या झाडांकडे आकर्षित होतो. त्यामुळे शक्यतो अशी झाडं एकदम घराशेजारी किंवा घरात लावणं टाळलं पाहिजे, किंवा जरी अशी झाडं आपण घरात लावलीच तर योग्य ती काळजी घेतली पाहिजे. अशा झाडाची मशागत करताना किंवा त्या खाली जर बसायचं असेल तर सर्व परिसर नीट लक्षपूर्वक पाहिला पाहिजे, कारण अशा ठिकाणी साप असल्याची शक्यता असते.

आज आपण ज्या झाडाची माहिती घेणार आहोत, ते झाड आहे चाफ्याचं. चाफ्यांच्या फुलांना सुंदर वास असतो. त्यामुळे अनेकजण हे झाडं आपल्या घरात लावतात. परंतु चाफ्याचं एक वैशिष्ट असं असतं की जिथे चाफ्याचं झाडं लावलं आहे, तिथे जमीन आपोआप भुसभुशीत होते. अशा ठिकाणी बिळ सहज बनू शकतं, त्यामुळे  या झाडाच्या आसपास उंदीर आणि घुशींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. उंदीर आणि घुशी अशा झाडाखाली बिळ करतात.

उंदीर आणि घुशी हे सापाचं मुख्य अन्न आहे, त्यामुळे नागासारखे विषारी साप उंदीर खाण्यासाठी अशा ठिकाणी येतात. त्यामुळे सर्पदंश होऊ शकतो.  तसेच चाफ्याचे पानं ही लांब असतात. ती खाली पडल्यानंतर त्यामुळे त्या परिसरात अडचण निर्माण होते, सापांना लपण्यासाठी जागा सापडते त्यामुळे देखील साप इथे येऊ शकतात. जर चाफ्याचं झाड मोठं असेल तर चाफ्याच्या झाडांवर काही पक्षी आपली घरटी करतात, पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी धामण प्रजाती सारखे साप इथे येऊ शकतात. त्यामुळे नेहमी काळजी घ्यावी .



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या 3 चित्रपटांना बॅन करण्याची मागणी, काहींनी तर फ्लॉप होण्यासाठी मागितलेली मन्नत, पण चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर
  • ‘त्या’ 3 शब्दांमुळे वाचाला इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन पायलटचा जीव, विमान कोसळल्यानंतर शेवटचे शब्द काय होते?
  • फळे-भाज्यांवरील कीटकनाशक कसे काढायचे? वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स
  • ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांसाठी तातडीचा अलर्ट, पुढच्या 48 तासांसाठी… वाचा नेमकं काय सांगितलं?
  • RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in