• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हेडफोन लावून खेळत होता PUBG, अचानक वाढलं ब्लड प्रेशर, ब्रेन हॅमरेजने तरूणाचा मृत्यू

February 9, 2026 by admin Leave a Comment


के-पॉप कल्चरचं वेड, मोबाईलचं व्यसन यामुळे गेल्या आठवड्यात तीन मुलींनी जीव दिला. मोबाईलच्या ॲडिक्शनमुळे तरूणांचे जाणारे जीव हे देशातील भयानक परिस्थिती समोर येत आहे. त्यातच अनेकांना मोबाईल गेमिंगच व्यसनही लागलेलं आहे. मात्र हीच सवय किती जीवघेणी ठरू शकते, त्याचं डोळे उघडणारं, जळजळीत उदाहरण समोर आलं आहे. मेरठमधून एक भयानक प्रकार समोर आला आहे. गाझियाबादमध्ये तीन बहिणींच्या आत्महत्येनंतर आता मेरठच्या खैरनगर भागात PUBG गेमच्या व्यसनाने 22 वर्षीय तरुण मोहम्मद कैफचा जीव घेतला आहे. रात्री उशीरापर्यंत गेम खेळणाऱ्या तरूणाचं ब्लड प्रेश इतकं प्रचंड वाढलं की त्याच्या डोक्यातील नसाच फुटल्या.

मेरठमधील खैरनगर गुलर वाली गली येथील रहिवासी असलेल्या फारूख हे प्रॉपर्टी डीलर होते. त्यांचा एकुलता एक मुलगा मोहम्मद कैफ (वय 22) हा शुक्रवारी रात्री त्याच्या खोलीत हेडफोन लावून मोबाईल फोनवर PUBG गेम खेळत होता. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, कैफ याला गेल्या चार महिन्यांपासून ऑनलाइन गेमिंगचे वेड लागलं होतं. शुक्रवारी रात्री पहाटे 3च्या सुमारास, तो गेम खेळत असताना अचानक बेडवरून पडला.

आवज ऐकून घरातले लोक त्याच्या रूममध्य पोहोचले, तेव्हा कैफ याची प्रकृती खूप नाजूक, गंभीर बनली होती. त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा तै अगदी हैराण झाले, कारण कैफचं ब्लड प्रेशर प्रचंड वाढलं होतं ते डायरेक्ट 300 वर पोहोचलं

उपचारांदरम्यान मृत्यू

त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला ताबडतोब दिल्लीला रेफर केले. दिल्लीतील रुग्णालयात दोन दिवस मरणाशी झुंज दिल्यानंतर रविवारी सकाळी कैफचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, जास्त ताण आणि उत्साहामुळे त्याचा रक्तदाब खूप वाढला, ज्यामुळे ब्रेन हॅमेरज (मेंदूतील नस फुटणे) झालं आणि हेच मृत्यूचे मुख्य कारण ठरलं.

रील बनवण्याचं वेड, मग गेमचं व्यसन लागलं

त्याच्या मृत्यूमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला, त्याचे वडील तर अगदी कोलमडून गेले. त्याच्या वडिलांच्या सांगण्यानुसार, त्याच्या मुलाला पूर्वी सोशल मीडियावर रील्स बनवण्याची आवड होती. पण गेल्या काही महिन्यांपासून तो PUBG गेमच्या इतका अधीन झाला होता की, त्याला व्यसनच लागलं होतं. तो रात्र-रात्र जागून गेम खळत बसायचा. आई-वडील, नातेवाईक सर्वांनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला,पण खेळाच्या वेडापुढे त्याने कोणाचंच काहीच ऐकलं नाही.

कैफ हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबावर मोठा आघात झाला. एकुलत्या एका मुलाच्या निधनामुळे पालक कोलमडून पडले आहेत. रडून रडून त्यांची अवस्था वाईट झाली.
ऑनलाइन गेममुळे तरुणांच्या मेंदूत ‘डोपामाइन’ची पातळी वाढते, ज्यामुळे त्याचे व्यसन लागतं असं मानसशास्त्रज्ञ सांगतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या जर्सीत थिरकलेली ‘ही’ तरुणी कोण? सोशल मीडियावर होतेय तिच्या डान्सची चर्चा
  • Chhatarapati Sambahjinagar ZP Election: संभाजीनगरात पाचोड गटातून खासदार भुमरेंचे पुतणे आघाडीवर
  • दिग्गज क्रिकेटपटूसोबत मोडला साखरपुडा… 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत घटस्फोट… वयाच्या 67 व्या मुलांसोबत एकटीच आयुष्य जगतेय अभिनेत्री
  • हेडफोन लावून खेळत होता PUBG, अचानक वाढलं ब्लड प्रेशर, ब्रेन हॅमरेजने तरूणाचा मृत्यू
  • बुलेटच्या वेगानी वाढतील केस, फक्त करा ‘हे’ घरगुती उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in