• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video

April 13, 2026 by admin Leave a Comment


सोन्याला पुरातनकाळापासून सर्वात मौल्यवान धातू म्हटले जाते. याची पिवळी सोनेरी चमक, शुद्धता आणि दीर्घकाळ खराब न होता टिकण्याच्या क्षमता यास खास बनवते. सर्वसाधारणपणे सोने कधीच खराब होत नाही असे म्हटले जाते. परंतू एक धातू असा आहे जो सोन्याचे गुणधर्म बदलून टाकू शकतो. हा धातू आहे पारा. ज्यास इंग्रजी मर्क्युरी म्हणतात.

पारा जेव्हा सोन्याच्या संपर्कात येतो, तेव्हा एक विशेष प्रक्रिया सुरु होते ज्यास Chemistry मध्ये अमलगमेशन म्हटले जाते. या प्रक्रियेत पारा सोन्याच्या सुक्ष्म कणांना आपल्या आत शोषून घेतो. याचा परिणाम हा होतो की सोने त्याची नैसर्गिक चमक हरवून बसते आणि त्यांचे स्वरुप बदलते. ते नरम, चिपचिपे आणि कधी-कधी धूसर किंवा चांदी सारखे दिसू लागते.

अखेर या व्हिडीओत काय झाले ?

हा कोणता नवा शोध नाही. जुन्या काळापासून सोन्याच्या खाणीत पाऱ्याचा उपयोग केला जात आहे.उत्खणन करताना जेव्हा सोने जेव्हा कच्चा स्वरुपात माती आणि दगडात मिक्स असते. तेव्हा त्याला वेगळे करण्यासाठी पारा उपयोगाला येतो. पारा सोन्याच्या कणांना आकर्षित करुन एक मिश्रण बनवतो. नंतर या मिश्रणाला गरम केले जाते. ज्यामुळे पारा बाष्प बनून उडून जातो आणि शुद्ध सोने खाली जाते. मात्र, ही प्रक्रिया औद्योगित स्तरावर नियंत्रित परिस्थितीत सुरक्षित असते.

घरगुती पातळीवर पाऱ्याचा संपर्क शरीरासाठी अत्यंत नुकसान दायक असतो. समजा घरातील एखादा जुना थर्मामीटर तुटला तर त्यातून निघालेल्या पाऱ्याचा चकूनही सोन्याच्या दागिन्यांना स्पर्श झाला तर याचे परिणाम धोकादायक होऊ शकतात. त्या दागिन्यांची चमक फिकी पडू शकते. त्यांचा रंग बदलू शकतो. आणि ते कमजोर होऊ शकतात. काही प्रकरणात दागिने इतके नरम होतात की ते तुटतात. अनेक लोकांना हा अनुभव सांगितला आहे.पाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर सोन्याचे दागिने चांदी सारखे दिसू लागले आणि हळूहळू त्यांची गुणवत्ता घसरत गेली.

Scientific Temper दुष्टीने पाहिले तर सोने हा स्थिर धातू आहे.तो सहजपणे कोणत्याही रासायनिक प्रक्रीयेत सामील होत नाही. अधिकांश एसिड देखील यास नुकसान पोहचवू शकत नाही. परंतू पाऱ्यासोबत याचा व्यवहार वेगळा होता. येथे कोणतीही सामान्य रासायनिक प्रतिक्रीया होत नाही. एक Alloy बनते. पारा सोन्याच्या अणूच्या दरम्यान जागा बनवतो आणि त्याच्या अंतर्गत संरचनेला बदलतो. याच कारणाने सोन्याचे गुण प्रभावित होतात.

येथे पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by NEWS 365 DAYS (@news360days)

केवळ सोनेच नाही तर पारा अन्य धातूंसोबत उदा. चांदी, जस्त आणि एल्युमिनियम सोबत देखील पाऱ्याची हीच प्रक्रिया होते. लोखंडासोबत मात्र पारा असे वागत नाही. त्यामुळे जुन्या काळात पाऱ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी लोखंडाची भांडी वापरायचे. पाऱ्याची आणखी एक धोका म्हणजे त्याचा विषारीपणा. हा धातु अत्यंत विषारी आहे. याची वाफ जर श्वासासोबत शरीरात गेली तर नर्व्हस सिस्टीम, किडनी आणि मेंदूला गंभीर नुकसान होऊ शकते. दीर्घकाळ याच्या संपर्कात आल्यानंतर स्मृती कमजोर होते. हातपाय थरथरणे आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. खास करुन लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी हा जास्त धोकादायक असतो. त्यामुळे पाऱ्याशी संबंधित गोष्टींना काळजीपूर्वक हाताळावे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई : हाय प्रोफाईल पार्टीतील जेवण पडलं महागात, तरूण-तरूणीचा गेला जीव, नेमकं काय घडलं?
  • Infinix Note 60 Pro 5G : आयफोन सारखा रंग ढंग, लाँच झाला ‘प्रो’ फिचर्सवाला जबरदस्त फोन, किंमत किती ?
  • Horoscope : 14 एप्रिल दिवस ठरणार खास, 3 राशीसांठी आला दुर्मिळ योगायोग; वाचा राशीभविष्य
  • IPL 2026 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक बदल, किती सामन्यांवर परिणाम?
  • Bhim Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठरेल विशेष, मित्र-मैत्रिणींना द्या या खास शुभेच्छा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in